Wheather Updates : येत्या 24 तासात अरबी समुद्रात चक्रीवादळ , जाणून घेऊया महाराष्ट्रावरील परिणाम

Wheather Updates : येत्या 24 तासात अरबी समुद्रात चक्रीवादळ , जाणून घेऊया महाराष्ट्रावरील परिणाम

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. पुढील 24 तासांत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल. या दरम्यान महाराष्ट्राच्या किनारपट्टी परिसरात 15 ते 17 मे दरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. येत्या 24 तासांत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल. त्यानंतर ते चक्रीवादळ गुजरात, पाकिस्तान किनाऱ्याजवळ पोहोचेल.

चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरील परिणाम:

14 मे रोजी कोकण, गोवा यांसह तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा सुटेल. तर काही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातदेखील अशीच अवस्था असेल.

Battlegrounds Mobile India Pre-registration : बॅटलग्राउंड मोबाइल प्री-रजिस्ट्रेशनच्या तारखेची घोषणा कस कराल रजिस्ट्रेशन

मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल. घाट विभागात मुसळधार पाऊस पडेल. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल, या चक्रीवादळादरम्यान समुद्र खवळलेला राहील. वाऱ्याचा वेगही प्रचंड असेल.असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here