Weather Updates : येत्या 4 तासांत मुंबई,ठाणे,सिंधुदुर्गात आणि रायगडात अतिवृष्टीची शक्यता

Weather Updates : येत्या 4 तासांत मुंबई,ठाणे,सिंधुदुर्गात आणि रायगडात अतिवृष्टीची शक्यता

Weather Updates :हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या चार तासांमध्ये याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

Dilip Kumar यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पत्नी ने मानले चाहत्यांचे आभार

पुणे(Pune), सातारा (Satara)आणि कोल्हापूर (Kolhapur) या परिसरात शनिवारी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. त्यामुळे लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.हवामान खात्याने सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात ढगफुटीचा इशारा दिला आहे. त्यामुळे याठिकाणी 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे.

मुंबई (Mumbai) आणि उपनगरातील अनेक भागांमध्ये पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे.

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दरात दुसऱ्या दिवशीही वाढ

ठाण्यात (Thane) सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे.येत्या तीन ते चार दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here