Vat Purnima 2021 Puja : जाणून घ्या विवाहित स्त्रिया वट पौर्णिमेचं व्रत का ठेवतात? उत्सवाबाबत सर्वकाही

Vat Purnima 2021 Puja

Vat Purnima 2021 Puja: पावसाळ्यात येणारा पहिला सण म्हणजे वटपौर्णिमा. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. या दिवसापासूनच सणांना सुरुवात होते. महाराष्ट्रात हा सण महिला उत्साहात साजरा करतात. दिवसभरात महिला कधीही वडाची पूजा करू शकता.

वटपौर्णिमेच्या पूजेचे साहित्य

वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा, सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती, धूप, दीप, अगरबत्ती, तूप, हळद-कुंकू, तर केळी, संत्री, सफरचंद, मोसंबी, चिकू अशी पाच प्रकारची फळे, फुले, दिवा ठेवण्यासाठी एक वस्तू, पाणी भरलेला एक कलश, लहान हिरव्या बांगड्या, तसेच तूप, दही, दूध, मध आणि साखर यांचे मिश्रण एका वाटीत घालून पंचामृत तयार करावे

Happy Father’s Day 2021 : जाणून घ्या या दिवसाचा इतिहास,महत्त्व आणि द्या भरपूर शुभेच्छा

पहिल्या पिसुन “चूल आणि मूल’ आणि “रांधा वाढा उष्टी काढा’ असे स्त्रियांच्या कामाचे स्वरूप होते. त्यामुळे या दिवस महिलांना नटण्याची आणि एकत्र राहण्याची संधी मिळायची. यावेळी उखाणेही घेतले जातात. शिवाय वडाच्या झाडाजवळ चांगला ऑक्सिजन मिळतो. महिला बऱ्यापैकी वेळ वडाच्या झाडाखाली घालवतात त्यामुळे त्यांना थोडीफार मोकळीक मिळते.

वटपौर्णिमा कशी साजरी करावी

सकाळीच महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. या दिवशी वडाला सात फेऱ्या मारून सात जन्मी हाच पती मिळावा यासाठी गाणी गाऊन प्रार्थना केली जाते. या दिवशी सुवासिनी सौभाग्यलंकार परिधान करून आणि अगदी नव्या कोऱ्या साड्या नेसून खास पूजा करायला एकत्र जमतात. संपूर्ण दिवस पौर्णिमा असल्यामुळे सकाळी आपल्या वेळेप्रमाणे वटसावित्री व्रताचा संकल्प करून तुम्ही वडाची पूजा करून घ्यावी.

वटपौर्णिमेचे व्रत

सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली आणि यमदेवाने तिथेच सत्यवानाला त्याचे प्राण परत दिले असा समज आहे. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. तीन दिवसांचे हे व्रत सध्या केवळ वटपौर्णिमेच्या एका दिवशीच करतात. महिला या दिवशी सजूनधजून वडाच्या झाडाची पूजा करायला जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here