Top CNG Cars In India : पेट्रोल पेक्षा दमदार, जाणून घेऊया सीएनजी कार्स बद्दल

Top CNG Cars In India : पेट्रोल पेक्षा दमदार, जाणून घेऊया सीएनजी कार्स बद्दल
Top CNG Cars In India : पेट्रोल पेक्षा दमदार, जाणून घेऊया सीएनजी कार्स बद्दल

Top CNG Cars In India : पेट्रोल पेक्षा दमदार, जाणून घेऊया सीएनजी कार्स बद्दल

देशात पेट्रोल आणि डिझेल च्या किंमती 100 पर्यंत गेल्या आहेत आणि अजूनही वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे बरेच लोक सीएनजी (CNG) आणि इलेक्ट्रिक (Electric) वाहने खरेदी करण्याकडे वळू लागले आहेत. आता भारतात सीएनजी वाहनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सीएनजी वर चालणारी कोणती वाहने सर्वोत्तम आहेत ते पुढे जाणून घेऊया

1 . Maruti Suzuki Alto

Maruti Suzuki Alto
Maruti Suzuki Alto

Maruti Suzuki Alto ऑल्टो कारमध्ये 800cc इंजिन आहे जे 40PS / 60Nm टॉर्क देते. या कारचं पेट्रोल व्हेरिएंट 1 लीटरमध्ये 22.05 लीटर मायलेज देते, तर 1 किलो सीएनजीमध्ये हे वाहन 31.59 किमीचं मायलेज देते. LXI आणि LXI (O) व्हेरिएंट सीएनजी प्रकारात उपलब्ध आहे.

JOBS In Maharashtra:आरोग्य विभागात 16 हजार पदांची भरती, 100 टक्के पदभरतीला मान्यता

2 . Maruti Suzuki Celerio

Maruti Suzuki Celerio

Maruti Suzuki Celerio मध्ये आपल्याला 1.0 लीटर पेट्रोल इंजिन मिळते. या कारचे सीएनजी इंजिन 57PS आणि 78Nm टॉर्क देते. तर पेट्रोल व्हेरिएंट 21 किमीचं मायलेज देतं, तर सीएनजीवर ही कार 30.47 किमी प्रति किलो इतकं मायलेज देते. या कारची किंमत 5.85 लाख रुपयांपासून सुरु होते.

3 . Maruti Suzuki S- Presso

Maruti Suzuki S- Presso या कारमध्ये 1.0 लीटरचे तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. सीएनजीवर हे वाहन 57 पीएस आणि 78 एनएम टॉर्क देते. सीएनजी व्हेरिएंट पेट्रोल व्हेरिएंटपेक्षा 10 किमी अधिक मायलेज देते. म्हणजेच प्रत्येक किलोग्राम सीएनजीमध्ये 31.2 किमीचं मायलेज मिळतं. S Presso सीएनजी कार LXI, LXI(O), VXI आणि VXI(O) व्हेरिएंटमध्ये येते.

Happy Mother’s Day 2021 : जाणून घ्या या दिवसाचा इतिहास , आईला दया एकदम खास शुभेच्छा

4 . Hyundai Santro

Hyundai Santro यात आपल्याला 1.1-लिटरचे चार सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळेल तर सीएनजी व्हेरिएंटमध्ये (CNG Variants) 60 पीएस आणि 85 एनएम टॉर्क मिळेल. मायलेजच्या बाबतीत, या कारचे पेट्रोल व्हेरिएंट 20.3 किमीचे मायलेज देते तर सीएनजी येथे 30.48 किमीचे (प्रति किलो) मायलेज देते. सीएनजीमध्ये आपल्याला मॅग्ना आणि स्पोर्ट्स प्रकार आढळतात. या कारची किंमत 5.92 लाख ते 6.06 लाखांपर्यंत आहे.

5. Maruti Suzuki WagonR

Maruti Suzuki WagonR ही कार 1.0 लीटर थ्री सिलिंडर इंजिनसह येते. यात आपल्याला 57PS आणि 78Nm टॉर्क मिळेल. या कारच्या मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास ही देशातील सर्वात जास्त मायलेज देणारी सीएनजी कार आहे. ही कार एक किलो सीएनजीवर 32.52 किमीचे मायलेज देते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here