Tips for long and healthy hair : चमकदार आणि लांब केसानसाठी ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

Tips for long and healthy hair
Tips for long and healthy hair

Tips for long and healthy hair :या हंगामात आपल्या त्वचेची आणि केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण या दिवसात आपले केस आणि त्वचा चिकट होते. या हंगामात लोक त्वचेकडे विशेष लक्ष देतात. मात्र, केसांकडे दुर्लक्ष करतात.

या दिवसात आपल्या त्वचेची आणि केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण या हंगामात आपले केस आणि त्वचा चिकट होते. या हंगामात लोक त्वचेकडे विशेष लक्ष देतात. मात्र, केसांकडे दुर्लक्ष करतात.

यामुळे केस चिकड होतात आणि तुटतात. आज आम्ही तुम्हाला केसांची कशापध्दतीने काळजी घ्यावी हे सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे केस सुंदर आणि जाड होतील. (Tips to get long hair)

कंडीशनिंग : आठवड्यातून 1 वेळेस केसांची कंडीशनिंग करा. यासाठी आपण हेअर मास्क वापरू शकता. आपण घरी हेअर मास्क तयार करू शकतो. यासाठी केळी, मुलतानी माती, दोन चमचे मध, अर्धा वाटी दही आणि लिंबू घालून मास्क तयार करा आणि केसांना लावा. सुमारे एक तासांसाठी हा हेअर मास्क केसांवर ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा.

Mansoon Health Tips In Marathi : पावसाळ्यात अशी घ्या काळजी,आजारांना ठेवा दूर

केस धुणे : कोरोना कालावधीमध्ये लोक घराबाहेर जाणे टाळत आहेत. अशा परिस्थितीत केसांना धूळ, माती आणि.प्रदूषणाचा सामना.लागत नाही. म्हणून आठवड्यातून दोनदा केस धुणे पुरेसे आहे जास्त.धुण्यामुळे केसांचा ओलावा कमी होतो. जरी आपण दररोज घराबाहेर पडत असाल तरी देखील दररोज आपले केस धुणे टाळा आणि घराबाहेर पडताना आपले केस झाका.

हेल्दी फूड : जितके केसांची बाहेरून काळजी घेणे आवश्यक आहे तितकेच आतून पोषण मिळणे देखील आवश्यक आहे. आपल्या आहारात ओमेगा -3 फॅटी अॅसिडस्, बायोटिन आणि इतर आवश्यक जीवनसत्त्वे आणि पोषक घटक असलेले पदार्थ समाविष्ट करा. आहारात अंडी, बेरी, पालक, मासे, फ्लेक्ससीड, बदाम, गाजर, बीट इ. समाविष्ट करा.

गरम तेलाची मालिश : वेळोवेळी टाळूला मॉइश्चराइझ करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी गरम तेलाची मालिश हा उत्तम मार्ग आहे. यामुळे केसांना ओलावाबरोबर पोषण आणि आवश्यक जीवनसत्त्वे मिळतात. यामुळे केस निरोगी होतात आणि त्यांची वाढ सुधारते. आठवड्यातून किमान 2 वेळेस गरम तेलाची मालिश केसांना करा.

नारळ तेल(Coconut oil) : केसांची लांबी वाढविण्यासाठी आपण रात्री नारळ तेलाने मेथी दाणे शिजवू ठेवा. त्यानंतर सकाळी उठून मेथी दाणे आणि तेल वेगळे करा आणि त्या तेलाने केसांच्या मुळांमध्ये मसाज करा. आठवड्यातून किमान 2 वेळा हे तेल लावावे. एका महिन्यात तुम्हाला फरक दिसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here