स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर सरकारला जाग ,घेतले काही मोठे निर्णय

स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर सरकारला जाग ,घेतले काही मोठे निर्णय

एमपीएससीची (mpsc)परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने पुण्यात आत्महत्या केली आहे. स्वप्निल लोणकर (वय-२४) असे त्याचे नाव आहे. स्वप्निलने फुरसुंगी परिसरातीलराहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली.

घटना बुधवारी (दि.२९ जून) रोजी घडली आहे. त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी काल आढळून आल्याने धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगत त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्यात तो पास देखील झाला होता. पण, यानंतरही त्याला नोकरी मिळाली नाही. याच नैराश्यातून त्याने हे धक्कादायक पाऊल उचलले.

Amir Khan Kiran Rao Divorce: आमिर खानचा दुसऱ्यांदा घटस्फोट, किरण रावसोबत 15 वर्षांनी काडीमोड

स्वप्नीलच्या आत्महत्येनं त्यांच कुटुंब दुःखात बुडालं आहे. स्वप्निलच्या मृत्यूचं वृत्त त्याची आई छाया लोणकर यांच्यासाठी मोठा आघात ठरला. तर विरोधकांनी देखील ठाकरे सरकारवर या सर्व प्रकरणामुळे सडकून टीकास्त्र डागले. राज्यातील विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहता एमपीएससी परीक्षे संदर्भात राज्य सरकार समिती गठीत करणार आहे.

ही समिती एमपीएससी परीक्षेसंदर्भात अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करणार आहे. आता राज्य सरकार यावर पावले उचलत आहेत. त्यामुळे स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्येनंतर आता कुठे सरकारला जाग आल्याची प्रतिक्रिया दिली जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here