Sushil Kumar Arrested : त्या रात्री नेमकं काय घडलं कि कुस्तीपटू सुशील कुमार पोहोचला गजाआड

Sushil Kumar Arrested

ऑलिम्पिक मेडलिस्ट कुस्तीपटू सुशील कुमार (Sushil Kumar) याला ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येच्या आरोपात (Sagar Dhankhad) अटक झाली आहे. सुशील कुमार दोन आठवड्यांपासून फरार होता. त्याच्यावर पोलिसांनी एक लाखाच्या बक्षीसाची घोषणाही केली होती.

सुशील कुमारनं या प्रकरणी कोर्टात धावही घेतली. पण त्याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला नाही. सुशील कुमारवर कलम 302 (हत्या), 365 (अपहरण), 120-B (गुन्हेगारी कट रचणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, 4 मेच्या रात्री उशिरा दिल्लीच्या मॉडेल टॉउन ठाण्याच्या परिसरात सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एक फ्लॅटमधून सागर आणि त्याच्या मित्रांचं अपहरण केलं. त्यानंतर छत्रसाल स्टेडियममध्ये नेऊन त्यांना बेदम मारहाण केली. दिल्ली पोलिसांच्या मते सागर आणि त्याच्या दोन मित्रांना अर्धमेले होईपर्यंत मारहाण झाली. फुटेजवरूनही हे स्पष्ट झालं असून, सुशीलही यात दिसत आहे.

सुशील कुमार आणि सागर धनखड यांच्यात पैशाच्या व्यवहारावरून वाद होते असंही समोर येत आहे. एकेकाळी सुशीलला आदर्श मानणारा सागर आधी ज्या फ्लॅटमध्ये मित्रांबरोबर भाड्याने राहायचा . पण सागरने भाडं न देताच फ्लॅट सोडला. सुशील कुमारनं अनेकदा भाड्याचे पैसे मागितले.

Corona Virus Latest Updates :राज्यात कोरोना स्थिती दिलासादायक, ४० हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

सागर टाळाटाळ करत होता. तसंच अनेक पहिलवान हे छत्रसाल स्टेडियम सोडून गेले होते. शिवाय सागरबरोबरही अनेक पहिलवान जाणार होते. त्यामुळं स्टेडियममधून मोठे क्रीडापटू जातील यामुळंही सुशील सागरवर नाराज होता. त्यानंतर हा प्रकारघडला. पण सुशीलनं तो निर्दोष असल्याचा दावा केला आहे.

तपासात समोर आलेल्या गोष्टी

*4-5 मे च्या रात्री पहिलवान सागरची हत्या झाली

*6 मे रोजी सुशील कुमार हरिद्वार-ऋषिकेशच्या एका मोठ्या बाबांच्या आश्रमात राहिला

*त्यानंतर 7 मेला तो पुन्हा दिल्लीला परत आला त्यानंतर सुशीलकुमार बहादुरगडला गेला बहादुरगडहून सुशील कुमार चंडीगडला गेला

-*चंडीगडहून तो परत भठिंडा इथं आला

*पुन्हा भठिंड्याहून चंडिगडला गेला त्यानंत पुन्हा चंडिगडहून सुशील गुरुग्रामला आला

*गुरुग्रामहून वेस्ट दिल्लीला आला आमि त्यानंतर 23 मे ला मुंडकामध्ये अटक झाली 8 वर्षांपासून घेत होता ट्रेनिंग

 

Ford F 150 : एका दिवसात 20,000 बुकिंग्स, जाणून घ्या अधिक माहिती

सागरचे वडील अशोक धमखड दिल्ली पोलिसांत कॉन्सटेबल आहेत. त्यांनी सांगितलं की, सागर 8 वर्षांपासून छत्रसालमध्ये ट्रेनिंग घेत होता. तो सुशील कुमारलाच गुरू मानत होता.

मी माझ्या मुलाला महाबली सतपाल यांच्याकडे सोपवलं होतं. माझा मुलगा देशासाठी पदक जिंकेत असं सतपाल यांनी सांगितलं होतं. आता दिल्ली पोलिसांच्या मते त्याच्याकडं सुशील कुमारविरोधात पुरेसे पुरावे आहे. यामुळं पुढं काय होणार पाहवे लागेल.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here