Sundar Pichai Birthday : एका विचाराने बदलले आयुष्य ,जाणून घ्या गुगलच्या सिइओ बद्दल

Sundar Pichai Birthday : एका विचाराने बदलले आयुष्य ,जाणून घ्या गुगलच्या सिइओ बद्दल

भारतीय वंशाचे सुंदर पिचाई जगातील सर्वात मोठी कंपनी अल्फाबेट (Alphabet) आणि तिची सहाय्यक कंपनी एलएलसीचे (LLC) मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. डिसेंबर 2019 मध्ये त्यांची Alphabet CEO म्हणून पदोन्नती झाली.

IBPS RRB Recruitment 2021:IBPS मार्फत 10000+जागांसाठी मेगा भरती

आज सुंदर पिचाई (Sundar Pichai) हे जगातील सर्वाधिक जास्त सॅलरी घेणारे  CEO आहेत.यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या जीवनाशी संबंधित काही खास गोष्टी पुढीलप्रमाणे

सुंदर पिचाई यांचा जन्म 10 जून 1972 रोजी तामिळनाडूच्या चेन्नई शहरात झाला. गूगलचे (Google) सीईओ सुंदर पिचाई यांचे पूर्ण नाव सुंदरराजन पिचाई आहे.

Solar Eclipse 2021:यावेळी हे सूर्यग्रहण विशेष,शनि जयंती दिवशी 148 वर्षानंतर सूर्यग्रहण

पिचाई यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्याचे वडील जीईसी या ब्रिटिश कंपनीत विद्युत अभियंता होते. आई स्टेनोग्राफर म्हणून काम करायची. सुंदर पिचाई यांनी वयाच्या 17 व्या वर्षी आयआयटी प्रवेश परीक्षा दिली.

त्यांनी खडगपूर येथून अभियांत्रिकी केली. पिचाई अभ्यासात खूप चांगले होते. त्यांनी अभियांत्रिकीच्या अंतिम परीक्षेतही अव्वल स्थान मिळविले आणि रौप्य पदक जिंकले.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर मास्टर डिग्रीसाठी ते स्टॅनफोर्ड येथे गेले. त्याने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आणि व्हार्टन स्कूल ऑफ बिझिनेसमधून पुढील अभ्यास केला.

Mumbai Building Collapse: इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू; सात जखमी

सुंदर पिचाई 2004 साली गूगलमध्ये जॉईन झाले. त्यावेळी ते कंपनीचे उत्पादन व नाविन्य अधिकारी (Product and Navigation) म्हणून सामील झाले होते. सुंदरचा पहिला प्रकल्प इतर ब्राउझरमधून Google वर ट्राफिक आणण्यासाठी प्रॉडक्ट मॅनेजमेंट आणि इनोव्हेशन शाखेत गुगलची सर्च टूलबार सुधारित करणारा होता. या दरम्यान, पिचाई यांनी अशी कल्पना दिली, ज्यामुळे त्यांना ओळख मिळण्यास मदत झाली. वास्तविक, त्याच्या प्रकल्पाच्या वेळी, पिचाई यांनी Google ने स्वतःचे ब्राउझर सुरू करावे अशी सूचना केली. या कल्पनेनंतर गूगलचे संस्थापक लॅरी पेज यांनी त्यांच्याकडे पाहिले आणि या कल्पनेने त्याचे जग बदलले.

MHT CET Registration 2021 : रजिस्ट्रेशन झाले चालू,असे करा रजिस्ट्रेशन

आज सुंदर पिचाई (Sundar Pichai) हे जगातील सर्वाधिक जास्त सॅलरी घेणारे  CEO आहेत.माध्यमांच्या अहवालानुसार सन 2020 मध्ये सुंदर पिचाईचा बेस पगार 2 दशलक्ष म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये एकूण 15 कोटी होता.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here