Shocking News : महिलेने एकावेळी दिला 9 मुलांना जन्म,जाणून घ्या अनोखी घटना

Shocking News : महिलेने एकावेळी दिला 9 मुलांना जन्म,जाणून घ्या अनोखी घटना

आईच्या गर्भाशयातून एकाचं वेळी दोन, तीन किंवा चार मुलांचा जन्म दिल्याच्या घटना नेहमीसारख्या घडतच असतात पण या महिलेने चक्क 9 मुलांना जन्म देऊन सर्वाना चकित केले आहे.कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही पण हे सत्य घटना आहे.

मोरोक्को मधील एक महिलेने मंगळवारी एकाच वेळी 9 मुलांना जन्म दिला आहे. ही घटना आश्चर्यकारक असूनही खूप विशेष आहे की ही सर्व मुलं पूर्णपणे निरोगी आहेत.

Kangana Ranaut Twitter Suspended: ट्विटर ने घेतली ऍक्शन अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड

माली सरकारने 25 वर्षांच्या हलिमा सीजेला 30 मार्चला चांगली देखभाल करण्यासाठी मोरोक्कोला पाठविले. पूर्वी असा विश्वास होता की, हलीमाच्या गर्भाशयात 6 मुले आहेत. एकाच वेळी 6 मुलांचा जन्म असामान्य आहे. तसेच 9 मुलांचा जन्म तर अजूनच असामान्य आणि अविश्वसनीय आहे .

मोरोक्कोच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते रचित कौधरी म्हणाले की , देशात एकाच आईपासून एकाच वेळी 9 मुलांच्या जन्माची माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही. परंतु मालीच्या आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, हलिमाने सीझेरियन शस्त्रक्रियेद्वारे पाच मुली आणि चार मुलांना जन्म दिला आहे.

IPL 2021 Suspended : IPL 2021 रद्द, BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्लांची माहिती

मालीचे आरोग्यमंत्री फांटा सिबी यांनी एएफपीला सांगितले की, आई व बाळ निरोगी आहेत ही खूप विशेष बाब आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here