Shivrajyabhishek Din 2021 : आजच्याच दिवशी झाला होता शिवरायांचा राज्याभिषेक , जाणून घेऊया त्यांच्या स्वराज्य संघर्षाबाबत

Shivrajyabhishek Din 2021 : आजच्याच दिवशी झाला होता शिवरायांचा राज्याभिषेक , जाणून घेऊया त्यांच्या स्वराज्य संघर्षाबाबत

छत्रपती शिवाजीराजे भोसले (Chhatrapati Shivaji Maharaj) (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.जाणून घेऊया या राज्याभिषेक दिनाचे महत्त्व

NITI Aayog : यावर्षी 2 सरकारी बँक खाजगी असतील, नीती आयोगाने दिली अंतिम यादी 

रायगडावर (Raigad) ६ जून इ.स. १६७४ रोजी छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा गागाभट्ट यांनी राज्याभिषेक झाला. सोहळ्यासाठी 32 मण सोन्याचे सिंहासन बनवले गेले होते. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. सुमारे 11000 ब्राह्मण आणि इतर लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते.

६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला.

Indian Army Recruitment 2021 : 100 जागांसाठी भरती , फक्त १० वी पास

शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले.  प्रजेनी महाराजानाआशीर्वाद दिला. ’शिवराज की जय’ शिवराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत ‘शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला.

पहिली स्वारी – तोरणगडावर विजय , जावळी प्रकरण,अफझलखान प्रकरण , प्रतापगडाची लढाई , कोल्हापूरची लढाई , पावनखिंडीतील लढाई ,   पुरंदराचा तह , मोगल साम्राज्याशी संघर्ष , शाहिस्तेखान प्रकरण , सुरतेची पहिली लूट , मिर्झाराजे जयसिंह प्रकरण , आगऱ्याहून सुटका , असा संघर्ष शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी केला.

Maharashtra Weather Updates :महाराष्ट्रात पाऊस दाखल,शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पंडित नेहरू आपल्या डिस्कवरी ऑफ इंडिया (भारताचा शोध) या ग्रंथात म्हणतात : “छत्रपती शिवाजी प्रतिहल्ला करणाऱ्या हिंदू राष्ट्रवादाचे प्रतीक होते. जुन्या इतिहासातून त्यांनी प्रेरणा मिळविली. महाराज अत्यंत धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्वगुण असणारे नेते होते. त्यांनी स्वराज्यासाठी चिवटपणे लढणारा गट म्हणून मराठी जनांना एकत्र केले, त्यांच्यामागे राष्ट्रीयत्वाची पार्श्वभूमी उभी केली आणि या गटास अशी चेतना दिली की या गटाशी धडका घेत मुघल साम्राज्य अखेर मोडकळीस आले. छत्रपतींचा मृत्यू १६८० मध्ये झाला तरी त्यांच्यानंतर संपूर्ण भारतावर प्रभुत्व प्रस्थापित होईपर्यंत मराठ्यांचा राज्यविस्तार होतच राहिला.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here