शरद पवारांनी सांगितला किस्सा ‘दिलीप कुमारांची(Dilip Kumar) एक झलक पाहण्यासाठी सायकलवरुन गेलो’

Dilip Kumar

दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.सर्वसामान्य चाहत्यांसोबतच देशभरातील सेलिब्रिटींनी देखील त्यांच्यासोबतचे फोटो आणि आठवणी शेअर करत यांना श्रद्धांजली वाहिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आपल्या तरुणपणीची एक आठवण शेअर करत दुःख व्यक्त केलं. शरद पवार दिलीप कुमार यांचे इतके मोठे फॅन होते की त्यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांनी चक्क सायकलवरुन प्रवास केला होता.

दिलीप कुमार यांना पहिल्यांदा जवळून पाहिलं तेव्हाचा किस्सा शरद पवार यांनी सांगितला. ते म्हणाले, “तेव्हा आम्हाला कळलं होतं की पुण्यातल्या जेजुरीजवळ दिलीप कुमार यांच्या चित्रपटाचं शूटिंग सुरु आहे. ते पाहायला आम्ही सायकलवरुन गेलो होतो. तेव्हा दिलीप कुमार यांना पहिल्यांदा जवळून पाहण्याची संधी मिळाली.

Covid Vaccine Certification : कोविड लसीकरण प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचे ,जाणून घ्या अधिक माहिती

पुढे विधीमंडळात, राज्य सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतर दिलीप कुमार आणि माझं एक वेगळं नातं निर्माण झालं होतं. माझ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये ते आग्रह करुन एखादी दुसरी सभा घेण्यासाठी येत असत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here