aaplamaharashtra

Satyashodhak Samaj

आपण महात्मा फुलेंचे चरित्र वाचतो. त्यावेळी Satyashodhak Samaj ‘सत्यशोधक समाजाचा उल्लेख होतो वक्ते, लेखक हरी नरके यांनी सत्यशोधक पद्धतीने लग्न केलं. आपल्यापैकी अनेक जणांना सत्यशोधक म्हणजे काय? सत्यशोधक समाजाचा पाया काय होता? सत्यशोधक समाजाची उद्दिष्ट्ये काय होती? महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना का केली? दिडशे शतकानंतरही सत्यशोधक समाजाची चर्चा केली जाते.’ याबाबत सविस्तर माहिती घेऊया,

महात्मा फुलेंचा जन्म 1827 चा वयाच्या 20-25 वयाचे असताना त्यांनी समाजसेवेचा मार्ग निवडला लोकांना होईल तिथकि आर्थिक मदत करणे, लोकांमध्ये जाऊन बदल घडवणे असे कार्य ते करत म्हणून फुलेंना बदल घडवणारे समाज सेवक म्हणून देखील ओळख झाली वयाच्या 50 शी च्या आसपास फुलेंना समाजसुधारणेच्या मार्गातील अडचणीचा चांगलाच अनुभव आला होता. भिक्षुकशाहीचा रग कमी झाल्याशिवाय आपण पेरलेल्या सुधारणा वाढीस लागणं शक्य नाही हे फुल्यांना लक्षात आलं आणि सुशिक्षित ब्राह्मणेतरांची एक सामुदायिक स्वरूपाची संस्था स्थापन करून तिच्यामार्फत चळवळ चालू करणं त्यांना अगत्याचं वाटू लागलं.” 1872-73 च्या काळात पुण्यात ब्राम्हणेतर समाजातील काही तरुण विध्यार्थी शाळेतून बाहेर पडली होती त्यांनाच आपण आपल्या चळवळीत उपयोगात अस ठरवल हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी जीवाचं रान करून एक सभा बोलावली या सभेसाठी फुल्यांनी, पुणे, मुंबई अश्या अनेक ठिकाणी सुशिक्षत मंडळीना विनंती पत्र लिहिले त्या सभेत 50 ते 60 जण फुल्यांच्या आमंत्रणाला मान देऊन पुण्यात सभेला आले.

त्या बैठकीचा दिवस होता. 24 सप्टेंबर 1873 याच दिवशी महात्मा फुल्यांनी ‘सत्यशोधक समाज नावाची ज्योत पेटवली आज 150 शतकांनतरही ही ज्योत अंधारलेल्या दिशांना उजेडाची मशाल बनून उभी आहे. 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची म. फुले यांनी स्थापना केली मात्र समाज अधिवेशनांची सुरुवात 1911 पासून झाली. सत्यशोधक समाजाची 1911 पासून 2007 पर्यत एकूण 35 अधिवेशने संपन्न झाली. स्वामी रामय्या वेंकय्या अय्यावरू यांच्या अध्यक्षतेने 17 एप्रिल 1911 रोजी पुणे येथे पार पडले. त्याच्या स्वागताध्यक्षपदी गणपतराव बिरमल होते.

Satyashodhak Samaj

आपला महाराष्ट्र न्यूज वेबसाईटवर आपले स्वागत आहे. आम्‍ही तुम्‍हाला सर्वोत्‍तम महाराष्ट्रच्‍या बातम्या देण्‍यासाठी समर्पित आहोत आणि विश्‍वासार्हता आणि संपूर्ण महाराष्ट्र तपशील यावर लक्ष केंद्रित करत आहोत.

https://chat.whatsapp.com/FDEIU5lI0XhIleB4HJauZ1

 

Satyashodhak Samaj सत्यशोधक समाज हेच नाव का?

Satyashodhak Samaj “सत्याचा शोध घेणे, सार्वजनिक सत्याचा आग्रह धरणं, सत्याच्या अनेक बाजू, अनेक पैलू, अनेक शक्यता लक्षात घेणारी ही संस्था म्हणून ‘सत्यसोधक समाज’ हे अन्वयार्थक नाव सर्वांनी संमत केलं. सत्याचा शोध विवेकनिष्ठ, नैतिक भूमिकेने सामुदायिक पद्धतीने घ्यावयाचा म्हणून ‘समाज’ हे पद त्या नावात समर्पक आहे.”

Satyashodhak Samaj सत्यशोधक हाच शब्द महात्मा फुलेंनी का वापरला किंवा, तो कुठून आला, असा पण प्रश्न अनेकांना पडतो ‘सत्यशोधक समाजाचा इतिहास’ या मध्ये महेश जोशी ने अस म्हटलय की . महात्मा फुले यांच्या तोंडी ‘सत्यशोधक समाज’ आणि ‘मानवधर्म’ असे दोन शब्द वारंवार आढळतात. यापैकी ‘दादोबा पांडुरंग यांच्याकडून ‘मानवधर्म’ हा शब्द आणि बाबा पद्मनजी यांच्याकडून ‘सत्यशोधक’ हा शब्द आलेला दिसतो.

सत्यशोधक समाजाचे ध्येय

पुरोहित, शेठजी, व जमीनदारांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून, व गुलामगिरीतून शुद्रातिशूद्र समाजाची सुटका करणे व त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुले यांनी ‘निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी’ हा विचार मांडला. निर्मिक हा शब्द देवाविषयी किंवा निसर्ग विषयी वापरला, त्यावरूनच महात्मा ज्योतिबा फुले व त्यांचा सत्यशोधक समाज हा आस्तिक होता, हे स्पष्ट होते. कनिष्ठ वर्गातील लोकांसाठी गुलामगिरी हा उपदेशपर ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला त्यानंतर महाराष्ट्रातील पंतोजी व शेडजींच्या मानसिक गुलामगिरी मधून कनिष्ठ वर्गाची मुक्तता करण्यासाठी चळवळ सुरू करण्याचा निश्चय फुले यांनी केला. ज्योतिबा फुले हे क्रांतिकारी नेते असल्याने त्यांच्या धोरणाला पोषक व वृत्तिशी सुसंगत असे व्यासपीठ निर्माण करणे त्यांना अत्यंत गरजेचे वाटले त्यामुळे त्यांनी सत्यशोधक समाजाची निर्मिती केली. सत्यशोधक समाजाचे तत्त्वज्ञान मानताना ईश्वर भक्तीचे श्रेष्ठत्व, एकेश्वरवाद सत्य हेच परम मानवी सदगुणांची जोपासना अशा प्रकारे वैचारिक आणि प्राथमिक भूमिका घेऊन सत्यशोधक समाजाने आपले तत्त्वज्ञान मांडले. निरपेक्ष भावनेने ईश्वराची भक्ती असावी. त्यामध्ये मध्यस्थीची अथवा भटभिक्षूची गरज नाही याचे प्रतिपादन सत्यशोधक समाजाने केले. तसेच व्यक्ती ही जन्मतः श्रेष्ठ नसते तर ती गुणकर्माने श्रेष्ठ ठरते. याचे स्पष्टीकरण सत्यशोधक समाजाने दिले आहे. पाप-पुण्य स्वर्ग-नरक पुनर्जन्म या गोष्टीला त्यांनी थारा दिला नाही तर सत्य हेच परब्रम्ह आहे अशा प्रकारचा विचार सत्यशोधक समाजाने मांडला मानवाच्या अंगी असलेल्या सद्गुणांची जोपासना व्हावी हा विचार दृढ करण्याचा प्रयत्न सत्यशोधक समाजाने केला. Satyashodhak Samaj

सत्यशोधक समाजाची तत्व

1) ईश्वर हा एक असून तो निर्गुण निर्विकार सर्वव्यापी व सत्यरुपी आहे आणि सर्व मानवप्राणी त्याची लेकरे आहेत..

2) प्रत्येक मानवास ईश्वराची भक्ती करण्याचा पूर्ण अधिकार आहे. जसे आईला संतुष्ट करण्यासाठी आणि बापाला विनवण्यासाठी जशी त्रयस्थ दलालाची गरज नसते त्याप्रमाणे परमेश्वराची भक्ती करण्यासाठी भट या दलालाची आवश्यकता नसते.
3) कोणतीही व्यक्ती जातीने श्रेष्ठ नसते, तर ती त्याच्या गुणांनी श्रेष्ठ ठरते
(४) निर्मिक सावयव रूपाने अवतरत नाही.
(५) पुनर्जन्म, मोक्ष, जपतप, परलोक कर्मकांड या गोष्टी अज्ञानमूलक असल्याने त्यांचा अवलंब माझ्याकडून होणार नाही.
(६) जनावरांची हत्या करण्यामध्ये मी सहभागी होणार नाही.
(७) दारूपासून अलिप्त राहण्यासाठी मी प्रयत्न करीन.
(८) समाजाच्या आर्थिक खर्चासाठी मी माझ्या उत्पन्नातून काही वर्गणी देईल.

तळी उचलली की तुम्ही सभासद होऊ शकता

Satyashodhak Samaj सत्य शोधक समाजाचे सभासद होण्यासाठी कुठल्याही धर्मातील आणि जातीतील लोकांना मुभा होती सत्यशोधक समाजाचा सभासद होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला शपथ घ्यावी लागत असे त्यानंतरच ते सत्यशोधक समाजाचे सभासद होत. खंडोबा हे सत्यशोधक समाजाचे दैवत आहे जोशी लिहितात. ‘बळीराजा हाच महाराष्ट्राचा राजा. बळी राजाने महाराष्ट्राची नऊ खंड केली होती आणि प्रत्येक खंडाच्या अधिकाऱ्याचे नाव खंडोबा. हा खंडोबाच सर्व मराठ्यांचा देव. त्यामध्ये जेजुरीचा एक सर्व मराठ्यांनी ज्योतिबाला, खंडोबाला व बहिरोबाला दैवत मानून त्यांची नावे सहभागी करून तळी उचलू लागते. प्रत्येक सभासदला खंडोबा या दैवतापुढे बेलपत्र उचलून शपथ घ्यावी लागत आणि ती उचलून तो सभासद होत. Satyashodhak Samaj

तळीचे सामान एका पिशवीत गुलाल, भंडार, गुळाचा खडा धने, विड्याची पाने खोबरच्या वाट्या, सुपारी हे असत तळी उचलताना ‘बहिरीचा चांगंभले” येळकोट वगैर तोंडाने बोलून त्या वीरास (देवास) पाचारीत असत

कोणती प्रतिज्ञा घेऊन सभासद होता येत.

Satyashodhak Samaj सत्यशोधक समाजाची प्रतिज्ञा घेऊनच सत्यशोधक समाजाचा सभासद बनता येते. सभासद बनण्यासाठी प्रतिज्ञा घेणे आवश्यक आहे “सर्व मनुष्य एकाच ईश्वराची लेकरे आहेत. त्यांचे व माझे बंधुत्वाचे नाते आहे. हे जाणून वागण्याचा मी नित्य प्रयत्न करीन. देवाची भक्ती पूजा अर्चना उपासना करताना त्याचप्रमाणे धर्मविधी करताना मी कोणतेही मध्यस्थ्याची मदत घेणार नाही. मी स्वतः असे वागून इतरांची ही मने वळवण्याचा प्रयत्न करीन. मी स्वतः सुशिक्षित बनून मुलास किंवा मुलीस सुशिक्षित बनवल्याशिवाय राहणार नाही. राज्यकर्त्यांशी एकनिष्ठेने वागेल, अशी सर्वसाक्षी सत्यस्वरुप परमात्म्याला मी प्रतिज्ञा करतो. हा माझा पवित्र उद्देश साध्य करून जन्माचे सार्थक करण्यासाठी परमेश्वर मला सामर्थ्य देवो.
‘इंग्रज सकारचे सर्व अधिकारी, भट, सावकार यांच्या कडून होणाऱ्या अन्यायाचा विरोध, मानसिक आणि सामाजिक गुलामगिरीतून बहुजनांची मुक्तता, मानवी हक्कांची शिकवण, हा सत्यशोधक समाजाचा त्रिसूत्री कार्यक्रम होता.

पहिले अध्यक्ष महात्मा ज्योतिबा फुलेच.

Satyashodhak Samaj सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष ज्योतिबा फुलेच होते आणि ते पहिले खजिनदारही होते, पहिले कार्यवाह म्हणून नारायण गोविंदराव कडलक यांची निवड झाली.

सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यानंतर जोतिबा फुलेंना अनेक नवीन कार्यकर्ते जोडले गेले, असाच एक कार्यकर्ता म्हणजे कृष्णराव पांडुरंग भालेकर यांचे नाव उघडकीस येते.

महाराष्ट्राच्या समान जीवनावर सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव व पडल्याचे ते लिहितात.

कृष्णराव पांडुरंग भालेकर हे कारकून म्हणून डिस्ट्रिक्ट जज कोर्टामध्ये कार्य करत होते. सत्यशोधक समाजाचे आजन्म कार्य करण्यासाठी भालेकर यांनी 1874 साली आपल्या नोकरीतून राजीनामा देऊन निवृत्ती घेतली ‘सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्यांनी कविता म्हणणे, सभा भरवणे, पोवाडे म्हणणे, उपदेश करणे अशा अनेक गोष्टी केल्या. Satyashodhak Samaj

फुलेंनी Satyashodhak Samaj सत्यशोधक समाजाची एक नोंदवही ठेवली होती, त्यामध्ये सत्यशोधक समाजाच्या नोंदी फुले लिहित असत. फुलें नंतर हि वही यशवंत यांच्याकडे गेली पण यशवंत यांच्या निधनानंतर हि नोंदवही कुणाकडे गेली. हि माहिती अदयाप लागलेली नाही. Satyashodhak Samaj

“आज जर तीन वाजेपर्यंत आमच्या अपृश्य हिंदू बांधवांना गणेश-पूजनाचा हक्क देण्याचा शहाणपणा जाबळे कमिटीने दाखविला नाही तर मी स्वत: ही गणपतीची मूर्ती फोडून टाकीन” हे उद्‌गार होते केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे

https://aaplamaharashtra.com/prabodhankar-thackeray-1926/#more-1050

Prabodhankar Thackeray 1926

Exit mobile version