३० हजार जणांचे मोफत लसीकरण,समता फाऊंडेशनचे उल्लेखनीय कार्य!

३० हजार जणांचे मोफत लसीकरण,समता फाऊंडेशनचे उल्लेखनीय कार्य!

समता फाऊंडेशनने १५ जूनपासून लस उत्सवाचे आयोजन केले आहे. लस उत्सवाचा लाभ १४ हजार नागरिकांनी दील्या असून येत्या १० दिवसात ३० हजार नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण होईल. समता फाऊंडेशनच्या या लस उत्सवाला रिसोड नगर परिषद, वाशिम जिल्हा परिषद, तालुका पत्रकार संघ, ग्रामीण पत्रकार संघ, तहसीलदार, सीटी केअर हॉस्पिटल, शाळा,कॉलेज, पतसंस्था यांनी सहकार्य केले आहे.

समता फाऊंडेशनने १५ जूनपासून भव्य लस उत्सव आयोजित केला. या लस उत्सवाची चर्चा महाराष्ट्रात व देशात सुरु आहे. समता फाऊंडेशनने मागील अनेक वर्षांपासून गरजू व गरीबांना मोठी मदत केली आहे. प्रसिद्ध उद्योगपती पुरुषोत्तम अग्रवाल यांनी स्थापन समता फाउंडेशनची स्थापना केली आहे. कोविड संकट काळात फाऊंडेशनने मास्क, धान्य, जेवण, सॅनिटायझर अशी मोठी मदत केली आहे

ट्विटरचा दणका रविशंकर (Ravi Shankar Prasad)प्रसाद यांचं अकाऊंट तासभर लॉक नंतर अनलॉक, नेमकं प्रकरण काय?

समता फाऊंडेशनचे कार्य २०० स्वयंसेवकांच्या साह्याने होत आहे. संस्थेने आतापर्यंत विविध स्तरावर सामाजिक कार्य केलेले आहे. मातांचे आरोग्य संवर्धन, कैद्यांना मदत, मुलांना संगणक प्रशिक्षण, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन असे विविध कार्यक्रम हाती घेऊन संस्थेने आदर्श प्रस्तापित केलेला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here