संभाजी राजेंचं फडणवीसांना(devendra fadnavis) साकड हात जोडून सांगतो माझं-तुझं न करता समाजासाठी एकत्र येऊ.

devendra fadnavis meet raje

खासदार संभाजीराजे छत्रपती आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असल्याचे चित्र सध्या पाह्यला मिळत आहे. सध्या संभाजीराजे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून विविध भागांमध्ये समाज बांधवांच्या भेटी व बैठक घेऊन त्यांच्या भावना समजावून घेत आहेत. कालच मराठा आरक्षण प्रश्नी चर्चा करण्यासाठी संभाजीरा जे यांनी शरद पवार यांची भेट घेतली घेतली होती.

आज त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(devendra fadnavis) यांची भेट घेतली. दुपारी बारा वाजताच्या सुमारास छत्रपती संभाजीराजे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली. यावेळी छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका फडणवीसांसमोर मांडली.

Maharashtra SSC Result 2021 : दहावीचा निकाल जूनमध्ये, 11 वी प्रवेशाची प्रक्रियाही ठरली

‘मी देवेंद्रजींना हात जोडून विनम्रपणानं सांगितलं माझं तुझं करण्यापेक्षा आपण समाजासाठी एकत्र येऊ. आपण एकत्र आलो नाही आणि समाजाला न्याय दिला नाही. तर जे काही समाजाचे होईलं त्याला तुम्ही-आम्ही सर्व जबाबदार ठरू,असं फडणवीसांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना खासदार छत्रपती संभाजी राजे म्हणाले.

आपल्याला मराठा समाजाला द्यायचा असेल तर राजकारणापलिकडे विचार करायला पाहिजे. म्हणून मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते या सर्वांनी एकत्र यायला हवं. नम्रतेने हात जोडून मी त्यांना सांगितलं की माझं-तुझं करण्यापेक्षा आपण सगळे एकत्र येऊ आणि समाजाला न्याय देऊ. कारण आता न्याय दिला नाही.

तर या समाजाचं काय होईल याला जबाबदार बाकी कोणी नसेल. त्याला माझ्यासकट हे सगळे नेते मंडळी, खासदार, आमदार हे जबाबदार असतील’, असं संभाजी राजे म्हणाले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर संभाजी राजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यानंतर संभाजीराजे पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट करणार आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here