SAIL Recruitment 2021 : डॉक्टरांची भरती,थेट मुलाखतीतून मिळणार नोकरी

SAIL Recruitment 2021 : डॉक्टरांची भरती,थेट मुलाखतीतून मिळणार नोकरी
SAIL Recruitment 2021 : डॉक्टरांची भरती,थेट मुलाखतीतून मिळणार नोकरी

SAIL Recruitment 2021 : डॉक्टरांची भरती,थेट मुलाखतीतून मिळणार नोकरी

SAIL Recruitment 2021 : वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीसाठी (Government Job) मोठी संधी आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (Steel Authority of India Limited ) ने डॉक्टर आणि परिचारिका साठी भरती चालू केली आहे त्यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नसून फक्त मुलाखती मधून नोकरी मिळणार आहे.

SAIL ने बोकारो जनरल रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांच्या 60 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे .पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन ऑनलाईन फॉर्म भरू शकतात.

अर्ज करण्यापूर्वी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अधिसूचना अधिकृत वेबसाईट- sailcareers.com वर जाऊन अधिक माहिती करून घ्यावी.

Coronavirus: भारतात पहिल्यांदाच चोवीस तासात कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा 3 लाखाच्या पार,कोरोना रुग्णसंख्येतही घट

परिचारिका आणि डॉक्टर या पदावर देण्यात आलेल्या या रिक्त जागेत अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार मुलाखतीत 3 मे 2021 ते 8 मे 2021 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत अर्ज भरू शकतात.

मुलाखतीच्या तारखा – 3 मे ते 8 मे 2021

रिक्त जागा (Vacancies) :
1 . डॉक्टर -30
2 . परिचारिका – 30

यासाठी अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत सूचना तपासा. यात निवड झालेल्या उमेदवारांना झारखंडच्या बोकारो जिल्ह्यात नोकरी करण्याची संधी मिळेल.

शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification )

1 . डॉक्टर – डॉक्टर पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस (MBBS) उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियामध्ये नोंदणी करणे महत्त्वाचे आहे.

CBSE Exam Result 2021 : दहावीच्या गुणांचे सूत्र जाहीर ,निकाल २० जूनला

2. परिचारिका – नर्सच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे बीएससी (नर्सिंग) BSC Nursing किंवा दहा + 2 इंटर सायन्स पाससह तीन वर्षे जीएनएम डिप्लोमा (GNM Diploma) असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन संपूर्ण माहिती पहा आणि मग नोंदणी करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here