कुत्रा करतोय यष्टीरक्षण आणि क्षेत्ररक्षण,खुद्द मास्टर-ब्लास्टरने (sachin tendulkar)शेअर केलाय व्हिडिओ

sachin tendulkar shares old video of dog playing cricket with children

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर(sachin tendulkar) याने काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. तो मैदानावर खेळताना दिसून येत नसला तरी देखील सोशल मीडियावर चाहत्यांसोबत नेहमी जोडलेला असतो.

काही दिवसांपूर्वी त्याने आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील सर्वोत्तम संघ निवडला होता. ज्यामध्ये त्याने एकही भारतीय खेळाडूला स्थान दिले नव्हते. आता नुकताच त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

सचिन तेंडुलकरचे सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोवर्स आहेत. या चाहत्यांसोबत जोडून राहण्यासाठी तो नेहमीच काही ना काही शेअर करत असतो.अशातच सोमवारी (२२ नोव्हेंबर) त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

हा व्हिडिओ खेडे गावातील दिसून येत आहे. ज्यामध्ये दोन लहान मुलं क्रिकेट खेळताना दिसून येत आहे. तर चक्क कुत्रा यष्टिरक्षकाची भूमिका पार पाडत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कुत्रा २ लहान मुलांसह क्रिकेट खेळण्याचा आनंद घेताना दिसून येत आहे. एक लहान मुलगा गोलंदाजी करतोय, तर लहान मुलगी फलंदाजी करताना दिसून येत आहे. तसेच कुत्रा यष्टिरक्षक आणि क्षेत्ररक्षकाची भूमिका पार पाडताना दिसून येत

MS Dhoni : टी-20 वर्ल्ड कप: टीम इंडियाच्या मेंटॉर भूमिकेसाठी धोनी कोणतीही फीस आकारणार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here