Sachin Tendulkar : ‘मिशन ऑक्सिजन’साठी सचिन तेंडुलकरची १ कोटींची मदत!

Sachin Tendulkar Donates INR 1 Crore to 'Mission Oxygen' to Procure Oxygen Concentrators

देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि मागील काही दिवसांपासून दररोज साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही कोलमडलेली पाहायला मिळत आहे. ऑक्सिजन मिळत नसल्यानं लोकांचा तडफडून मृत्यू होत आहे… हॉस्पिटल्समध्ये बेड्स मिळत नाहीत.त्यामुळे एकूणच देशात गंभीर वातावरण आहे. अशात अनेक दिग्गज मंडळींनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. ‘Mission oxygen’ ही मोहीम सुरू झाली आहे आणि त्याच्या माध्यमातून देशांतील अनेक हॉस्पिटल्सना देणगी व ऑक्सिजन सिलेंडर दान केले जाणार आहेत.

हे नक्की वाचा: ’International Dance Day 2021: जाणून घेऊया या दिवसाचे महत्व आणि थीम.

फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) यानं ‘Mission Oxygen’ या उपकरर्मात सहभाग घेतला आहे आणि त्यानं स्वतः १ कोटींची मदत जाहीर केली आहे. त्यानं इतरांनाही या चळवळीत हातभार लावण्याचं आवाहन केलं आहे. तो म्हणाला,’’कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण केला आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवणे ही सध्याच्या तासाची गरज बनली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहून वाईट वाटत आहे. २५०+ अधिक युवा उद्योजकांनी मिशन ऑक्सिजनची सुरूवात केली आहे. त्याच्या माध्यमातून ते निधी गोळा करून ऑक्सिजन खरेदी करणार आहेत आणि देशातील हॉस्पिटल्सना दान करणार आहेत.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here