1,299 रुपयांमध्ये रियलमी फिचर फोन Realme Dizo Star सादर

Realme Dizo Star Feature phones

Realme Dizo Star Feature phones: Realme च्या सब-ड्रड Dizo चे दोन फिचर फोन फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आले आहेत. रियलमी Dizo Star 300 आणि Dizo Star 500 साठी एक प्रॉडक्ट पेज फ्लिपकार्टने बनवले आहे.

या प्रॉडक्ट पेजवर या फोन्सच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती देण्यात आली आहे.Di70 Star 300 आणि Star 500 ची किंमत Realme Dizo Star 300 ची किंमत 1,299 रुपये असेल. तर Dizo Star 500 फोन 1,799 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हे दोन्ही फोन लवकरच फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होतील.

Realme Dizo Star Feature phones

Dizo Star 300 स्पेसिफिकेशन आणि फीचर्स(Dizo Star 300 specification)

डिझो स्टार 300 मध्ये 1.77 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह 0.3MP रियर कॅमेरा आहे. Dizo Star 300 मध्ये 32MB ची इंटरनल स्टोरेज मिळेल. या फिचर फोनमध्ये 2,550 एमएएचची बॅटरी मिळेल.

Realme Dizo Star Feature phones

एअरटेलचा (Airtel)धमाका प्लान,एका दिवसात यूज करू शकता ५० जीबी डेटा

Dizo Star 500 चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

डिझो स्टार (Dizo Star)500 मध्ये 2.8 इंचाचा मोठा डिस्प्ले सोबत फोनमध्ये 32MB ची स्टोरेज मिळेल. हा एलईडी फ्लॅशसह 0.3MP च्या व्हीजीए रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. या फोनमध्ये 1900 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. डिझो स्टार 500 मध्ये वरच्या बाजूला टॉर्च देखील देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here