Realme Dizo Phones: रिअलमी डिझो देणार जिओ फोन ला टक्कर

Realme Dizo Phones: रिअलमी डिझो देणार जिओ फोन ला टक्कर

Dizo अंतर्गत फोन फिचर फोन लाँच केले जातील, अशी चर्चा आहे.

Gizmochina च्या अहवालानुसार, Realme च्या सब-ब्रँड कंपनी DIZO चे दोन फीचर फोन FCC सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसले आहेत. या फोनची नावं Dizo Star 500 आणि Dizo Star 300 असतील. इतकेच नव्हे तर या फीचर फोन्सचे फोटोज देखील समोर आले आहेत.

Maharashtra Lockdown: राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाउन कायम; पण ‘या’ ठिकाणी होणार निर्बंध कमी

Features :

1. Dizo Star 500 मध्ये एक मोठा डिस्प्ले

2 . Dizo Star 300 मध्ये मोठी बॅटरी

3 . दोन्ही फोन सिंगल रियर कॅमेर्‍याने सुसज्ज

4. दोन्ही फोन्समध्ये 2G कनेक्टिविटी

5 . Star 500 – 1830 mAh , Star 300 – 2500mAh  बॅटरी

स्टार 500 फीचर फोनमध्ये स्टार 300 फोनपेक्षा मोठा डिस्प्ले मिळू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

लाँच होणार बहुचर्चित Poco M3 Pro 5G स्मार्टफोन, पाहा फीचर्स आणि किंमत

दोन्ही फोन्सच्या डिस्प्लेच्या खाली ‘DIZO’ ची ब्रँडिंग देण्यात आली आहे. त्याचबरोबर, फोनमध्ये डुअल-सिम आणि एक माइक्रो एसडी कार्ड स्लॉट पण देण्यात येईल.

या दोन्ही फोन्समध्ये 2G कनेक्टिविटी मिळेल, असे सांगण्यात आले आहे. या फोन्समध्ये सिंगल कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश मिळेल. स्टार 500 फीचर फोनची बॅटरी 1,830एमएएचची असू शकते, तर स्टार 300 (Dizo Star 300 ) फीचर फोनमध्ये 2,500 एमएएचची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here