Radhe | सलमान खानचा ‘राधे’ आज प्रदर्शित होणार,कधी, कुठे आणि कसा पाहता येणार चित्रपट

Radhe Moive

सलमानची प्रमुख भूमिका असेलला ‘राधे(Radhe) युवर मोस्ट वॉण्टेड भाई’ आज प्रदर्शित होणार आहे. सलमानचे चाहते या चित्रपटाची प्रतीक्षा करत होते. कोरोना महामारीमुळे हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. भारतात हा सिनेमा पे-पर-व्यू म्हणजेच डिजिटल प्लॅटफॉर्मवर या चित्रपटासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. जर तुम्हा दुसऱ्यांदा हा चित्रपट पाहायचा असेल तर तुम्हाला पुन्हा पैसे मोजावे लागतील.

तर ‘राधेः युवर मोस्ट वॉण्टेड भाई’ सिनेमा आखाती देशांसह इतर देशांमध्ये चित्रपटागृहांमधअये प्रदर्शित होणार आहे. प्रभुदेवा हा या चित्रपटा दिग्दर्शक आहे. चित्रपटात दिशा पाटनी, रणदीप हुडा, बिग बॉस फेम गौतम गुलाटी आणि जॅकी श्रॉफ यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.

Marathi Cinema : दिग्दर्शक केदार शिंदे २५ वर्षानंतर दुसऱ्यांदा अडकले लग्नबेडीत

चित्रपटात सलमान खानने (Salman Khan)एका पोलीस अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारली असून तो ड्रग माफियाला संपवतो. अॅक्शन, कॉमेड आणि ड्रामाने भरलेला ‘राधे’ ‘राधे’ हा पूर्णपणे कमर्शियल पॅकेज आहे. या सिनेमात अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि म्युझिकचा भरणा आहेत.

देशभरात ईद उद्या म्हणजेच 14 मे रोजी साजरी होणार आहे. परंतु चित्रपट आजच 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. आज दुपारी 12 वाजता चित्रपटाच्या ऑनलाईन स्ट्रीमिंगला सुरुवात होईल ‘राधेः युवर मोस्ट वॉण्टेड भाई’ जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. भारतात तो झी5, झीप्लेक्स आणि झी चॅनलवर पे पर व्ह्यू नुसार पाहता येईल.

म्हणजेच इथे तुम्हाला जवळपास 249 रुपये मोजून चित्रपट पाहावा लागेल. याशिवाय हा चित्रपट इतर डीटीएच ऑपरेटर्स जसे की डी2एच, टाटा स्काय आणि एअरटेल डिजिटलवरही पे सर्व्हिसद्वारे उपलब्ध असेल. यामध्ये प्रेक्षकांना मल्टीपल ऑप्शनही देण्यात आले आहेत. प्रेक्षक त्यांच्या सोयीनुसार चित्रपट पाहू शकतात.

चित्रपट पाहण्यासाठी युझर्सना Zeeplex वर जाऊन निश्चित रक्कम भरावी लागेल. ओटीटी झी5 ने ठरवलं आहे की, “जे प्रेक्षक झी सिनेप्लेक्सवर ‘राधे: युवर मोस्ट वॉण्टेड भाई’ पाहण्यासाठी पैसे भरतील त्यांना वर्षभर झी5वर उपलब्ध असलेला कंटेट पाहता येईल.”

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here