PUBG चं भारतात कमबॅक?आता पुन्हा चौकाचौकात राडा अन् धूर

PUBG Mobile India

केंद्र सरकारने भारतात PUBG या लोकप्रिय गेमिंग अॅपसह 118 चिनी ॲप बॅन केले होते त्यापूर्वी केंद्र सरकारने टिक टॉक, शेअरइट, हॅलो, यूसी ब्राऊझर यांसारखे एकूण 59 अॅप्लिकेशन बॅन केले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी PUBG Mobile गेम आता भारतात परतणार असल्याचे सांगण्यात आले होते.

तेव्हापासून हा गेम नेमका कधी लाँच होणार याची पबजी गेमच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. तर काहीजण असंही म्हणत आहेत की पबजी गेम भारतात परतण्याच्या शक्यता आता मावळल्या आहेत. दरम्यान, पबजी मोबाईल इंडिया हा गेम लवकरच भारतात लाँच होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पबजी (PUBG Mobile India) भारतातली क्रेझ अजूनही संपलेली नाही. कित्येक महिने वाट पाहिल्यानंतरही चाहत्यांच्या आशा जिवंत आहेत. अशा परिस्थितीत दोन दिवसांपूर्वी भारतीय चाहत्यांसमवेत असेच काहीसे घडले, जेव्हा पबजी मोबाइल इंडियाने एकाच वेळी 4 नवीन ट्रेलर अपलोड करण्यात आले होते. ही सूचना पाहून चाहते खूप उत्साही झाले होते, परंतु काही काळानंतर ते निराश झाले कारण कंपनीने ते सर्व व्हिडिओ त्वरित डिलीट केले. दरम्यन, पबजी मोबाईल इंडिया या गेमच्या लाँचिंगबाबत काही विस्वसनिय सूत्रांनी माहिती दिली आहे की लवकरच हा गेम भारतात लाँच केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे कंपनी यावेळी वेगळ्या नावासह गेम लाँच करु शकते. तर काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हा गेम आता भारतात लाँच याच्या शक्यता कमी झाल्या होत्या.

हे नक्की वाचा: Moto G50 स्मार्टफोन लाँच, पाहा कॅमेरा ,बॅटरी आणि अधिक माहिती

काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, हा गेमल लवकरच भारतात पुनरागमन करेल.रिपोर्ट्सनुसार नवा गेम भारता Battleground Mobile India या नावासह लाँच केला जाऊ शकतो..PUBG Mobile India ची ऑफिशियल वेबसाईट आता नवी क्रिएटिव्ह कंपनी म्हणून सुरु आहे. तसेच ही कंपनी नव्या नावासह भारतात त्यांचा गेम लाँच करु शकते. PUBG Mobile च्या भारतीय व्हर्जनचं नाव ‘Battleground Mobile India’ असं असेल. ही माहिती नवीन पोस्टर विमोवरील एका व्हिडीच्या एम्बेड लिंकवरुन मिळाली आहे.

काही दिवसांपूर्वी काही मिनिटांसाठी जारी केलेले ट्रेलर बघून असे वाटले होते की, काहीतरी नवीन जाहीर करत आहे, परंतु असे झाले नाही. 29 एप्रिल रोजी पबजी मोबाइल इंडियाने आपल्या सब्सक्रायबर्सना एक नोटिफिकेशन पाठवलं होतं. लोक गेल्या वर्षापासून या नोटिफिकेशनची प्रतीक्षा करत आहेत. जेव्हा बऱ्याच लोकांनी नोटिफिकेशन ओपन करुन सर्च केले की, पबजी मोबाईल इंडिया भारतात पुनरागमन कधी करणार आहे? तेव्हा त्यांच्या हाती काहीच लागलं आहे. परंतु त्या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये म्हटलं होतं की, ऑल न्यू पबजी मोबाईल कमिंग टू इंडिया. परंतु काही मिनिटातच तो ट्रेलर डिलीट करण्यात आला. अशा परिस्थितीत ट्रेलर पाहणाऱ्या युजर्सना निराश व्हावे लागले आहे. या 4 ट्रेलरमध्ये काहीही नवीन नव्हते, हे व्हिडीओल्या वर्षीच्या नोव्हेंबरमधल होते. गेल्या वर्षीही पाबजीने असेच काहीसे व्हिडीओ शेअर केले होते.

नव्या गेममध्ये बदल केले जाणार

PUBG Mobile India नावाचा एक नवीन गेम लाँच.केला जाणार आहे. यात काही बदल केले जातील जे पूर्णपणे इंडियन गेमर्ससाठी.असतील. हा गेम व्हर्चुअल सिम्युलेशन ट्रेनिंग गाऊंडमध्ये.सेट केला.जाईल आणि नवीन कॅरेक्टर्स क्लोथ अँड ग्रीन.हिट इफेक्ट्स स्टार्ट करु शकतील. PUBG कॉर्पोरेशन.भारतात आपली व्याप्ती वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. या नोकरीच्या ड्स्क्रीप्शनमधून याचा अंदाज लावता येईल दरम्यान,असेही सांगण्यात आले आहे की, ही जॉब व्हॅकेन्सी कंपनीच्या बंगळुरु येथील कार्यालयासाठी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here