Prithviraj Movies : अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ चित्रपटाला करणी सेनेचा विरोध,पहा काय आहे कारण

Prithviraj Movies : अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ चित्रपटाला करणी सेनेचा विरोध,पहा काय आहे कारण

बॉलिवूडचा सिनेमा करणी सेनेच्या (Karni Sena) निशाण्यावर आला आहे, या सिनेमाचे नाव आहे, ‘पृथ्वीराज’(Prithviraj). अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) या आगामी सिनेमाच्या नावाला करणी सेनेने विरोध दर्शवत हे टायटल बदलण्याची मागणी केली आहे.

करणी सेनेच्या युवा संघटनेचे अध्यक्ष आणि फिल्ममेकर सुरजीत सिंह राठोड यांनी सिनेमाचे टायटल बदलण्याची मागणी केली आहे .

Barrister Babu : ‘गुद्दन तुमसे ना हो पायेगा ‘ अभिनेत्री कनिका मान शोमध्ये बोंडिताची भूमिका साकारणार 

अक्षय कुमारचा आगामी सिनेमा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. मग सिनेमाचे नाव ‘पृथ्वीराज’ कसे? सिनेमाच्या नावातही पृथ्वीराज चौहान यांच्या पूर्ण नावाचा उल्लेख केला जावा आणि त्यांचा आदर करण्यात यावा, असे सुरजीत सिंह (Surjit Singh)यांनी म्हटले आहे.

अक्षयचा हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी करणी सेनेसाठी या सिनेमाचे स्क्रीनिंग करण्यात यावे, अशी अटही त्यांनी ठेवली आहे. मेकर्सनी आमचा सल्ला मानला नाही तर त्यांना वाईट परिणामांचा सामना करावा लागेल.

Kuchh Rang Pyar Ke Aise Bhi 3 : देव-सोनाक्षीच्या बदललेल्या नात्यावर नवीन प्रोमो

‘पद्मावत’(Padmavat)  सिनेमावेळी संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali)  यांच्या सोबत काय झाले, हे त्यांनी विसरू नये, असा इशारा सुरजीत सिंह यांनी दिलाय.

Corona Virus Latest Updates : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत घट

चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित हा सिनेमा आदित्य चोप्राची (Aaditya Chopra) निर्मिती आहे. अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांच्या सोबतच या चित्रपटात सोनू सूद(Sonu Soos) आणि संजय दत्त(Sanjay Datta)  यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here