aaplamaharashtra

Prabodhankar Thackeray 1926

साल 1926 स्थळ दादर  Prabodhankar Thackeray “आज जर तीन वाजेपर्यंत आमच्या अपृश्य हिंदू बांधवांना गणेश-पूजनाचा हक्क देण्याचा शहाणपणा जाबळे कमिटीने दाखविला नाही तर मी स्वत: ही गणपतीची मूर्ती फोडून टाकीन” हे उद्‌गार होते केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांचे, गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सण देशभरात मोठया उत्साहाने साजरा केला जातो. गणेशोत्सवच्या काळात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन उत्सव साजरा करतात महाराष्ट्रात अनेक गणेशोत्सव मंडळ मोठ्या आनंदाने हा सण साजरा करतात. सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना ही समाजाला एकत्र आणण्यासाठी मांडण्यात आली होती. परंतु मुंबईमधील दादरच्या गणेशोत्सव मंडळाने काही काळानंतर महोत्सवाच्या मुळ हेतूला फाटा दिला गेला. केवळ काही जातीसमूह हांच्या हाती देण्याचा प्रयत्न विसाव्या शतकाच्या सुरुवातीला करण्यात येत होता असं प्रबोधनकार ठाकरे यांनी त्याच्या पुस्तकामध्ये सांगितलं आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी माझी जीवन गाथा या पुस्तकात संबंधाची घटना सांगितली आहे. त्याकाळी दादरमध्ये राहणाप्या लोकांच वर्णन करताना प्रबोधनकार ठाकरे म्हणतात. त्याकाळी दादरला ब्राम्हण – आणि ब्राम्हणेतरचा कुठेच वाद दिसत नव्हता. (Prabodhankar Thackeray)

‘ये रे दिवसा भर रे पोटा’ अशा स्वभावाच्या लोकांनी गजबजलेल्या विभागामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद करायचा वेळच नव्हता, तिथे राहत असणान्या सर्वच जमाती पोटार्थी होत्या. ज्याप्रमाणे आज मुंबईमध्ये लोकलच्या वेळापत्रकावर धावत असणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी आहे. अगदी त्याप्रमाणेच त्या काळातही दादरमध्ये. जे गरीब लोक आहेत. ज्यांचे हातावर पोट आहे. अशा लोकांची गर्दी होती परंतु या भागामध्ये सर्व सार्वननिक सण मात्र मोठ्या आनंदाने साजरे केले जात होते. 1926 साली सार्वजनिक उत्सवांवर दादर मध्ये राहणाया ब्राम्हण समाजाचा प्रभुत्व होत अस जरी असल तरी सगळ्या जाती धर्माचे लोक वर्गणी आवर्जून देत अनेक जणांना सार्वजनिक गणेशोत्सवात काम करायला वेळ भेटत नसे. त्यामुळेच गणेशोत्सवाच्या ब्राम्हण मंडळीच्या वर्चश्व वर कुणीही आक्षेप घेतला नव्हता पण कालांतराने परिणाम असा झाला की सार्वजनिक गणेशोत्सवाने सगळेच पदाधिकार ब्राम्हण झाले. एवढच नाही तर सार्वजनिक गणेशोत्सवासाठी आमंत्रित केलेले कीर्तनकार, वक्ते, शाहीर सुद्धा ब्राम्हण समाजाचेच असत. गावातील एखाद्या व्यक्तीने ब्राम्हण नसलेल्या शाहिरांचे, कवीचे नाव सुचविल्यास कार्यकारी मंडळा कडून त्या नावास मान्यता मिळत नसे, दादर मध्ये स्थायिक ब्राम्हण समाजामधील काही व्यक्तींची ही मनमानी पाहून बाम्हणेतर समाजातील युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली युवक मंडळ काढला होता. (Prabodhankar Thackeray)

Prabodhankar Thackeray

आपला महाराष्ट्र न्यूज वेबसाईटवर आपले स्वागत आहे. आम्‍ही तुम्‍हाला सर्वोत्‍तम महाराष्ट्रच्‍या बातम्या देण्‍यासाठी समर्पित आहोत आणि विश्‍वासार्हता आणि संपूर्ण महाराष्ट्र तपशील यावर लक्ष केंद्रित करत आहोत.

https://chat.whatsapp.com/FDEIU5lI0XhIleB4HJauZ1

Prabodhankar Thackeray लिहिलेले आहे कि,

(Prabodhankar Thackeray) जर अखिल हिंदूंचा सार्वजनिक गणेशोत्सव, तर त्यामध्ये स्पृश्यां बरोबर अस्पृश्यांनाही भरपूर भाग होता आला पाहिजे. इतकेच नव्हे तर कोणत्याही अस्पृश्याला सार्वजनिक उत्सवामधील गणपतीच्या मूर्तीचे पूजन स्वतः करण्याचा हक्क असला पाहिजे ही भूमिका या सगळ्या युवक मंडळांची होती. त्यामुळे दादरच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला एका बाम्हणेतर युवक संघाने त्यासंदर्भातील पत्र पाठवले. न्याकाळात या मंडळाचे अध्यक्ष डॉ. मो. चि. जावळे होते. त्यांना सुधारक युवक संघाचे पत्र आले दादरच्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारणीवर भूकंप आला कारण पाचशे बहुजन व्यक्ती ने प्रत्येकी चार आणे वर्गणी जमवून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सभासदत्व घेतले होते अस्पृश्य समजले जाणारे लोक धर्माने हिंदूच असल्यामुळे, सार्वजनिक म्हणविणाऱ्या गणेशोत्सवाच्या उत्सवमूर्तीचे प्रत्यक्ष शिवून पूजन करण्याचा त्यांना हक्क असलाच पाहिजे, आणि तो आम्ही यंदा सिद्ध करणार अशी मागणी या युवक मंडळाने केलेली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्याकाळी वेगवेगळ्या ठिकाणी अशाच युवक चळवळी सुरू होत्या. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी काय होणार याच वरून प्रचंड तणाव निर्माण झाला होता. काही चुकीचे प्रकार घडू नये म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष जावळे यांनी ब्रिटिशांची एक पोलिस पार्टी अगोधरच त्या भागात बोलावली होती.

त्याकाळी ब्राम्हण समाजाचे नेते म्हणून ओळखले जाणारे दादच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे त्यावेळचे अध्यक्ष डॉ. मो. चि. जावळे होते. त्याकाळात दादरच्या कबुतरखान्याजवळील मशिदीबाबत वाद निर्माण झाला होता, त्या वादामध्ये जावळे यांच्या भूमिकेमुळे ‘ते “मशिदफेम” जावळे म्हणून प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर पुढे ते मुंबईचे महापौर ही बनले होते. दादरचे आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) आणि भंडारी समाजाने नेते रावबहादुर बोले, यांच्या. नेतृत्वाखाली करण्यात आले,

गणेश चतुर्थीचा दिवस उजाडला.

 

गणपतीचा मंडप हा दादरच्या टिळक पुलाच्या पायर्थ्यांशी सजवलेला होता. त्या मंडपामध्ये बनवण्यात आलेल्या मखरात गणपतीची मूर्ती त्यादिवशी सकाळी आणून ठेवलेली होती. तर दुसरीकडे टिळक पुलावर बहुजन समाजातील तरुणांची गर्दीच्या गर्दी जमा होत होती राव बहादूर बोलेंच्या नेतृत्वात ही सर्व तरुण सुधारक मंडळी पुलावर थांबली होती. (Prabodhankar Thackeray) प्रबोधनकार ठाकरे सांगतात की “10 च्या सुमाराला भास्कर कद्रेकर माझ्याकडे धापा टाकीत आला. पुलावर लोकांचा भला मोठा जमाव गोळा झाला आहे आणि त्यांची मागणी अशी आहे.

रावबहादूर बोले सकाळपासून त्यांच्याशी चर्चा करीत आहेत. तुम्हाला बोल्यांनी ताबडतोब बोलाविले आहे. चला. ” के.सी. ठाकरे (Prabodhankar Thackeray) तिथे गेले आणि . जमा झालेल्या गर्दीला म्हणाले की इथं कशाला थांबतात. सगळेच लोक म्हणाले उत्सवाचे मेंबर आहोत
तेव्हा चला रे सारे आपण प्रथम मंडप काबीज करू आपलाच आहे तो अस म्हणताच पाचशे ते सहाशे तरुणांची गर्दी गणपतीच्या मंडपात गेली तेवढयात डॉ. जावळे यांनी बोलावलेल्या ब्रिटिश पोलीसांने त्या गर्दीला हाकलण्याचा प्रयत्न केला मात्र प्रबोधनकारांनी सांगितलं की “इथे कोणतीही दंगल झालेली नाही, त्यामुळे पोलिसांचं इथे काहीच काम नाही, तुम्हीच इथून निघून जा. मानद न्यायाधीश रावसाहेब बोले इथे उपस्थित आहेत त्यामुळे पोलिसांची आम्हाला अजिबात गरज नाही.” हे ऐकुन ब्रिटिश पोलीसाची तुकडी बाजुला झाली. त्याच बरोबर डॉ. जावळेंच्या नेतृत्वातील कार्यकर्ते ही देखील बाजूला झाले युवक चळवळीच्या मंडळाच्या नेत्यांची भाषणे तिथे सुरू झाली. दुपारचे बारा वाजले गणपती ची प्रतिष्ठापना झाली नाही त्याच सोबत वाद मिटायची चिन्ह दिसत नव्हती.

प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांच्या भाषणात म्हणाले कि, “आज जर आमच्या अस्पृश्य हिंदू बांधवांना गणेश-पूजनाचा हक्क तीन वाजेपर्यंत देण्याचा शहाणपणा जावळे कमिटीने दाखविला नाही, तर मी स्वतः ही गणपतीची मूर्ती फोडून टाकीन.”

Dr babasaheb ambedkar

हे ऐकल्यानंतर डॉ. जावळेंनी रावबहादूर बोले यांच्याकडे जाऊन वाद मिटवण्यासाठी ‘डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पाचारण करण्याचे ठरले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राव बहादुर बोले आणि प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) तसेच आणखीण पाच-सहा जण डॉ. जावळे यांच्या घरी एकत्रित एक बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये असे ठरविण्यात आले कि, ब्राह्मण पुजाऱ्याने आधीच्या रितीरिवाजाप्रमाणे ब्राम्हण पुजाऱ्याने प्राणप्रतिष्ठा पूर्वक शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करावी.

पूजा झाल्यावर कोणत्याही अस्पृश्याने अंघोळ करून एक पुण्पगुच्छ स्वतः नेऊन त्या ब्राम्हण पुजायाच्या हातामध्ये स्वत: स्पर्श केलेला पुष्पगुच्छ दयावा, आणि पुजायाने कोणतीही तक्रार न करता अस्पृश्याने स्पर्श केलेला पुष्पगुच्छ घेऊन गणपतीला वाहावा, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे dr babasaheb ambedkar अंगरक्षक म्हणून राहिलेल्या मड़के बुवांनी गणपतीला फुले वाहिली. यानंतर एक जेष्ठ दलित कार्यकर्ते म्हणून मडके बुवा यांना अंघोळ घालण्यात आली आणि त्यांनंतर सगळ्यांच्या समोर मडकेंनी स्वत: स्पर्श केलेला एक लाल गुलाबांचा गुच्छ त्या ब्राम्हण पुजायाच्या हातात दिला. आणि त्या ब्राम्हणाने तो पुष्पगुच्छत गणपतीला वाहिला. शेवटी त्यादिवशीचा वाद तिथेच संपला, मडकेबुवांच्या बाबतीत बोलताना व सचिन परब म्हणतात कि “मडकेबुवा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. आताच्या मुंबईत परळचा जो मुख्य चौक आहे त्याला मडकेबुवांच नाव दिलेलं आहे.” अंगापिंडाने धिप्पाड असणारे मडके बुवांनी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अंगरक्षक म्हणून देखील काम केले होते. त्यांच्या हातून हे फुल घेऊन गणपतीला अर्पण करण्यात आले प्रबोधनकारांनी हि आक्रमक भूमिका घेतली म्हणूनच हे घडू शकल. मात्र यामुळे दादरचा गणेशोत्सव प्रबोधनकारांनी बंद पाडल्याची बोंबाबोंब सुरू झाली ज्याकाळी दलितांना देवळाच्या आजूबाजूला फिरण्याची परवानगी नव्हती. दलितांच्या सावलीमुळे विटाळ होत असे. असा समज काही वरच्या जातीचा होता.
त्याकाळात केवळ ब्राम्हणांच्या हातातूनच पूजा होत असे त्याकाळात पूजेचा एक भाग एका दलित व्यक्तीच्या हातातून होणे ही एक खरोखरच मोठी क्रांती होती.

क्रांती होऊनही गणेशोत्सव मात्र बंद पडला.

प्रबोधनकार ठाकरेंनी (Prabodhankar Thackeray)  त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे कि, त्यावर्षीच्या अनंत चतुर्दशी पर्यंत सर्व कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडले. मात्र आंदोलन झाल्यामुळे या उत्सवातला आनंदच नाहीसा झाला होता. कित्येक मंत्रजागरवाल्या भिक्षुकांनी ‘गणपती बाटला’ म्हणून ऐनवेळी निमंत्रणास नकार दिला. त्यावेळेस दुसरा कोणतातरी कार्यक्रम ठेऊन वेळ घालवण्यात आला. आजपर्यंत या सर्व जाती जमातींकडून या उत्सवाला वर्गव्या मिळत गेल्या. पण यापुढे जाऊना या वर्गव्या कोणी देऊ नयेत. असा जर प्रचार झाला तर कसं होईल? अखेरच्या रात्री डॉ. जावळे यांनी सभेत असे सांगितले कि. “यंदाच्या झालेल्या प्रकारावरून हा उत्सव पुढे चालू ठेवणे सर्वतोपरी अशक्य आहे. निदान मी तरी या फंदात मुळीच पडणार नाही.” झालं दादरचा सार्वजनिक गणेशोत्सव बंद पडला. त्यानंतर दादरमध्ये पुढची तीस वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव साजराच झाला नाही, त्यानंतर दादरमधील समर्थ व्यायाम मंदिराच्या गणोशोत्सवाला ‘सार्वजनिक’ हे लावण्यात आले आणि गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. पुढे जाऊन प्रबोधनकार ठाकरे आणि राव बहादूर बोले यांच्या नेतृत्वाखाली लोकहितवादी संघ स्थापन केला गेला. या संघाचा उद्देश बहुजन समाजाला सामावून घेण्यासाठी एखादा सण साजरा केलो जावा असा होता. आणि प्रबोधनकार ठाकरे आणि रावबहादूर बोले यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच श्री शिव भवानी नवरात्र महोत्सव सुरू केला.

पहिल्या मसुद्यात देशाच्या नावाचा उल्लेख असलेले कलम 1 मध्ये ‘भारत’ हा शब्द नव्हता India Shall bea Union of States अस म्हटलं होत त्यानंतर जवळपास वर्षभरानंतर 17 सप्टेंबर 1949 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी सुधारणा सुचवल्या एक दुरुस्ती म्हणून India that is Bharat Shall be a Union of states प्रस्तावित केल त्या दिवशी इंडिया म्हणजे भारत.

https://aaplamaharashtra.com/india-vs-bharat-controversy/

india vs bharat controversy

Exit mobile version