POST OFFICE Schemes : पोस्ट ऑफिसच्या योजना देणार मोठा फायदा, जाणून घ्या अधिक माहिती

POST OFFICE Schemes : पोस्ट ऑफिसच्या योजना देणार मोठा फायदा, जाणून घ्या अधिक माहिती
POST OFFICE Schemes : पोस्ट ऑफिसच्या योजना देणार मोठा फायदा, जाणून घ्या अधिक माहिती

POST OFFICE Schemes : पोस्ट ऑफिसच्या योजना देणार मोठा फायदा, जाणून घ्या अधिक माहिती

POST OFFICE Schemes : सुरक्षित भविष्यासाठी योग्य ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी पोस्ट ऑफिस च्या योजना आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.जाणून घेऊया पोस्ट ऑफिस योजनांविषयी

(1) सुकन्या समृद्धी खाते (SSA) :
या योजनेंतर्गत तुम्ही किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1,50,000 रुपये आर्थिक वर्षात जमा करू शकता. मुलींसाठी तयार केलेली सुकन्या समृद्धी योजना सध्या 7.6 टक्के व्याज देते. त्यानुसार गुंतवणुकीच्या दुप्पट रकमेसाठी 9.47 वर्षे लागतील. या योजनेचा लाभ 10 वर्षांखालील मुली घेऊ शकतात.

(2) बचत खाते (बचत बँक) (SB) :
हे खाते पोस्ट ऑफिसमध्ये उघडण्यासाठी तुम्हाला किमान 500 रुपये जमा करावे लागतील. त्यामध्ये केवळ 4 टक्के व्याज प्राप्त केले जाते. यानुसार आपली गुंतवणूक दुप्पट करण्यास किमान 18 वर्षे लागतील. प्राप्तिकर विभागाच्या नियमांनुसार, जर पोस्ट ऑफिस बचत खातेधारकाला एका वर्षात 10 हजारांपेक्षा कमी व्याज मिळाले, तर ते करमुक्त आहे.

NHAI Recruitment 2021 : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणात नोकरीची संधी , कोणत्याही परीक्षेविना

(3) रिकरिंग डिपॉझिट (RD) :
रिकरिंग डिपॉझिट (Recuring Deposit ) खाते उघडल्यावर तुम्हाला वार्षिक 5.8 टक्के व्याज (तिमाही चक्रवाढ) मिळेल. यात तुम्ही मासिक रक्कम किमान 100 रुपये किंवा दहा रुपयांच्या गुणांकात पैसे जमा करू शकता. आपले पैसे दुप्पट करण्यास 12.41 वर्षे लागतील.

(4) टाईम डिपॉझिट (TD) :
टाईम डिपॉझिट (Time Deposit) खात्यात तुम्हाला 1, 2 आणि 3 वर्षांसाठी 5.5 टक्के आणि 5 वर्षांसाठी 6.7 टक्के व्याज मिळेल. जर आपण 5 वर्षांची मर्यादा निवडली तर आपले पैसे सुमारे 10.75 वर्षांमध्ये दुप्पट होतील. त्याच वेळी जर आपण 3 वर्षांसाठी गुंतवणूक केली, तर 13 वर्षांत आपले पैसे दुप्पट होतील. त्यास 80 सीनुसार करात सूट मिळते.

Maharashtra’s Top News : ‘कोविशिल्ड’ पाठोपाठ आता ‘कोवॅक्सिन’ची निर्मितीही महाराष्ट्रात होणार

(5) मासिक उत्पन्न योजना खाते (MIS) :
मासिक उत्पन्न योजना खाते किमान 1 हजार रुपये देऊन उघडता येते. त्याची मुदत 5 वर्षे निश्चित केली आहे. यात एकच खातेदार जास्तीत जास्त साडेचार लाख रुपये आणि संयुक्त खातेदार 9 लाख रुपये जमा करू शकतो. या योजनेत सध्या 6.6 टक्के व्याज मिळते. त्यानुसार 5 वर्षांसाठी साडेचार लाख रुपये जमा केल्यावर तुम्हाला दरमहा 2,475 रुपये व्याज म्हणून मिळेल. यात आपले पैसे दुप्पट करण्यास सुमारे 10.91 वर्षे लागतील. या योजनेंतर्गत मिळणारी व्याज रक्कम करपात्र असेल.

(6) राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC):
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (National Saving Certificate) योजनेत आपण पैसे ठेवल्याच्या तारखेपासून 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच रक्कम जमा होईल. सरकारने त्यावर 6.8 टक्के व्याज निश्चित केले आहे. त्यानुसार 10 लाख रुपये त्यात जमा केल्यास 5 वर्षांनंतर तुम्हाला 13,89,490 रुपये मिळतील. त्याच वेळी जर तुम्हाला गुंतवणुकीची रक्कम दुप्पट करायची असेल तर तुम्हाला 10.59 वर्षे प्रतीक्षा करावी लागेल. ते जमा केल्यानंतर 80 सी अंतर्गत कपात करण्यासाठी वैध आहे.

(7) किसान विकास पत्र (KVP) :
पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) योजनेत वार्षिक व्याज 6.9 टक्के दिले जाते. त्यानुसार आपली गुंतवणुकीची रक्कम 124 महिन्यांत (10 वर्षे आणि 4 महिन्यांत) दुप्पट होईल. कोणतीही जास्तीत जास्त गुंतवणूक मर्यादा नाही. आपण किमान 1 हजार रुपयांसह प्रारंभ करू शकता.

BNP Recruitment 2021: बँक नोट प्रेसमध्ये 135 जागांसाठी भरती, 12 मेपासून करा अर्ज

(8) ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) :
पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजने(SCSS) मध्ये आपण किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा करू शकता. या योजनेत सध्या 7.4 टक्के दराने व्याज मिळत आहे. आपण या योजनेत गुंतवणूक करत असल्यास आपले पैसे दुप्पट करण्यास 9.73 वर्षे लागतील.

(9) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)
कर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नोकरदार व्यक्ती या योजनेचा अधिक फायदा घेऊ शकतात. कारण या योजनेत आर्थिक वर्षात 15 लाख रुपयांपर्यंतची कर कपात उपलब्ध आहे. त्याचबरोबर व्याजदेखील करमुक्त आहे. या योजनेत आपण एका आर्थिक वर्षात किमान 500 आणि जास्तीत जास्त 1,50,000 रुपये जमा करू शकता. त्याला वार्षिक (कंपाऊंड वार्षिक) 7.1 टक्के दराने व्याज मिळते. त्यानुसार आपले पैसे दुप्पट करण्यास सुमारे 10.14 वर्षे लागतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here