लाँच होणार बहुचर्चित Poco M3 Pro 5G स्मार्टफोन, पाहा फीचर्स आणि किंमत

Poco M3 Pro 5G

Poco M3 Pro 5G फोनला कंपनीच्या लाइनफ मध्ये भारतातील पहिल्या 5G फोनच्या रुपात सादर केलं जाणार आहे. Poco M3 Pro 5G स्मार्टफोन भारतात कधी लाँच होणार याबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. Poco M3 Pro 5G स्मार्टफोनची भारतातील लाँचिंग डेट (launching date) समोर आली आहे. Poco M3 Pro फोन भारतात 8 जून रोजी लाँच होणार कंपनीने जाहीर केलंय. हा फोन जगभरात गेल्या महिन्यात लाँच झाला आहे.

Poco चा एम 3 प्रो 5G फोन विक्रीसाठी Flipkart वर उपलब्ध असेल, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. पोको M3 प्रो 5G फोनला कंपनीच्या पोर्टफॉलियोमध्ये भारतातील पहिल्या 5G फोनच्या रुपात सादर केलं जाणार आहे.

Poco M3 Pro flipkart

Flipkart वर फोनचं बॅनर लाईव्ह करण्यात आलं आहे. याचाच अर्थ हा फोन फ्लिपकार्ट एक्सक्लूझिव असेल. ग्लोबल लाँचिंगच्या (global launching) अंदाजावरून हा स्मार्टफोन 3 कलर ऑप्शनसह (color options) मार्केटमध्ये लाँच झाला आहे. यामध्ये पावर ब्लॅक, कूल ब्लू आणि पोको यलो कलर्सचा समावेश आहे.

ECIL Recruitment 2021 : ECIL मध्ये विविध रिक्त पदाची भरती 

Poco M3 Pro Features

– 6.5 इंच फुल एचडी+ IPS LCD स्क्रीन(1080×2400 पिक्सल रेझॉल्यूश)

– डिस्प्ले पंच-होल डिझाईन

– स्मार्टफोन डिस्प्ले 20:9 आणि रिफ्रेश रेट 90Hz

– साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर

– 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज

– मीडियाटेक डायमेन्सिटी 700 चिपसेट प्रोसेसर

– 5000mAh बॅटरी, 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट

– वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, एनएफसी, 5G, 3.5mm हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-C पोर्ट

Poco M3 Pro किंमत

Poco M3 Pro दोन व्हेरियंटमध्ये आणला आहे. 4 जीबी + 64 जीबी आणि दुसरा 6 जीबी +128 जीबी. याच्या 4 जीबी रॅम व्हेरियंटची किंमत भारतात जवळपास 14,200 रुपये आहे. तर, 6 जीबी रॅम व्हेरियंटची किंमत भारतात 16 हजार रुपये असेल, असा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here