Miss Universe 2020:मेक्सिकोच्या अँड्रा मेझा (Andrea Meza) ही तरुणी ठरली यंदाची ‘मिस युनिव्हर्स

Miss Universe 2020

मिस युनिव्हर्स (Miss Universe 2020) ही सौंदर्य स्पर्धा नुकतीच पार पडली. यंदाचं या स्पर्धेचं हे 69 वं वर्ष होतं. या स्पर्धेत मेक्सिकोच्या अँड्रा मेझा (Andrea Meza) हिनं बाजी मारली आहे. तिनं मिस युनिव्हर्सच्या सोनेरी मुकुटावर आपलं नाव कोरलं. 2019 मधील विजेता झोजीबिनी तुझी हिच्या हस्ते तिला सन्मानित केलं गेलं.

जगभरातून सध्या या सौंदर्यवतीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मॅक्सिकोनं गेल्या 69 वर्षांच्या इतिहासात पाचव्यांदा मिस युनिव्हर्स या किताबावर आपलं नाव कोरलं आहे.

 

कोरोनाच्या वाढत्या प्रमाणामुळे गेल्या वर्षीची मिस युनिव्हर्स ही स्पर्धा पुढे ढकलून यंदाच्या वर्षी घेण्यात आली. जगभरातील सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग.घेतला होता. परंतु यापैकी केवळ चारच तरुणींना.अंतिम फेरीपर्यंत धडक मारता आली. अतिम फेरीत.ब्राझिलची जुलिया गामा , पेरुची जॅनक मसिट (Janick Macet) भारताची अँडलिन कॅसलिनो (Adline Castelino) आणि मेक्सिकोची अँड्रा मेझा (Andrea Meza) यांची जोरदार टक्कर झाली.

Radhe | सलमान खानचा ‘राधे’ आज प्रदर्शित होणार,कधी, कुठे आणि कसा पाहता येणार चित्रपट

परंतु ब्राझिल, पेरु आणि भारतावर मात करत मेक्सिकोनं विजेता पदावर आपलं नाव कोरलं. अँड्राने मेक्सोकोसाठी पाचव्यांदा मिस युनिव्हर्स ही स्पर्धा जिंकली. अँड्रावर संपूर्ण जगातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तिचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here