दिग्गज धावपटू मिल्खा सिंग (milkha Singh)यांचे कोरोनामुळे निधन

milkha singh pass away

दिग्गज धावपटू मिल्खा सिंग (milkha Singh)यांचे 91 व्या वर्षी कोरोना मुळे निधन झाले आहे। 17 मे रोजी मिल्खा सिंग यांचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारत होती, त्यानंतर 31 मे रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. डिस्चार्जनंतर ते सेक्टर-8 येथील आपल्या घरात कोविड नियमांचं पालन करीत आराम करीत होते.

मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मिल्खा सिंग यांच्या निधानाने आपण एक महान खेळाडू गमावला आहे ज्यांनी देशातील नागरिकांच्या मनात आपलं एक विशेष स्थान निर्माण केले होते.

प्रेरणादायक व्यक्तिमत्व लाखो लोकांपर्यंत पोहोचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करताना मिल्खा सिंग यांच्यासोबतचा एक जुना फोटोही ट्विट केला आहे.

Shivrajyabhishek Din 2021 : आजच्याच दिवशी झाला होता शिवरायांचा राज्याभिषेक , जाणून घेऊया त्यांच्या स्वराज्य संघर्षाबाबत

मिल्खा सिंग त्यांनी आशियाई स्पर्धेत चार सुवर्ण पदक (Gold Medal) जिंकले होते. तसेच राष्ट्रकूल स्पर्धेतही विजेतेपद पटकावले. रोममध्ये 1960 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी सर्वोत्तम कमगिरी केली. मात्र त्यांचे कांस्यपदक (Bronze Medal) अगदी थोड्या फरकाने हुकले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here