MHADA Lottery 2021: 8948 घरांची सोडत जाहीर,इथे पाहा कुणाला मिळणार घर

mhada konkan mandal house lottery mhada lottery 2021

MHADA Lottery 2021: आज म्हाडा कोकण मंडळाच्या 8 हजार 948 घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. म्हाडानं गेल्या महिन्यात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती.

लॉटरीतील 8 हजार 948 घरांसाठी तब्बल 2 लाख 46 हजार अर्ज आले होते. आज सकाळी 10 वाजल्यापासून या घरांच्या सोडतीला सुरुवात झाली. एकेका संकेत क्रमांकानुसार, ऑनलाइन सोडत काढण्यात आली. प्रथम आलेल्या 100 जणांना सभागृहात बसण्याची परवानगी देण्यात आली होती.

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते सोडतीचा आरंभ झाला असून यावेळी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, तसेच ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आदी उपस्थित होते. तर गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ऑनलाईन कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या http://mhada.ucast.in या संकेतस्थळावरून सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात आलं.

MAHAVITARAN Recruitment 2021 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये भरती

सोडतीसाठी दोन लाख 46 हजार 650 नागरिकांनी अर्ज भरले आहेत. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नागरिकांना हक्काच्या घराची गोड बातमी मिळावी म्हणून ढोल-तुतारीच्या निनादात सोडतीचे नियोजन करण्यात आले होते

. ठाण्यातील कार्यक्रमास उपस्थित राहू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी स्वतःचे ओळखपत्र व अर्जाची मूळ पावती सोबत आणावी, असे आवाहन मंडळाने केले होचे. सोडतीचा निकाल आज सायंकाळी 6 वाजता https://lottery.mhada.gov.in संकेतस्थळांवर प्रसिद्ध केला जाईल, अशी माहिती कोकण मंडळाचे मुख्य नितीन महाजन यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here