Marathi Cinema : दिग्दर्शक केदार शिंदे २५ वर्षानंतर दुसऱ्यांदा अडकले लग्नबेडीत

Marathi Cinema : दिग्दर्शक केदार शिंदे २५ वर्षानंतर दुसऱ्यांदा अडकले लग्नबेडीत
Marathi Cinema : दिग्दर्शक केदार शिंदे २५ वर्षानंतर दुसऱ्यांदा अडकले लग्नबेडीत

Marathi Cinema : दिग्दर्शक केदार शिंदे २५ वर्षानंतर दुसऱ्यांदा अडकले लग्नबेडीत

केदार शिंदे (Kedar Shinde)हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक देखील आहेत.केदार शिंदे पंचवीस वर्षांनंतर दुसऱ्यांदा आपल्या पत्नीसोबतच पुन्हा लग्न केले आहे.

केदार शिंदे यांनी लग्नाच्या २५ व्या वाढदिवसादिवशी पत्नी बेलासोबत पुन्हा लग्न केले आहे . अंकुश चौधरी, शर्मन जोशी, भरत जाधव (Bharat Jadhav), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav), आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) आणि सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) यांनी या घरगुती सोहळ्यास हजेरी लावली होती तसेच या सोहळ्याला मराठी आणि हिंदी कलाकारांनी व्हिडीओ कॉलद्वारे हजेरी लावली होती.

Maharashtra Corona Virus Updates : रविवारी राज्यात 60,226 रुग्ण बरे होऊन घरी तर 48,401 नवीन रुग्ण

केदार शिंदे आणि बेला शिंदे (Bela Shinde) यांनी पळून जाऊन लग्न केल्यामुळे पहिल्या लग्नात कन्यादानाचा विधी पार पडला नव्हता. या लग्नात लॉकडाउनमुळे बेलाचे आई वडिल येऊ शकले नाहीत. त्यामुळे या लग्न सोहळ्यात कन्यादान आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी केले.

तसेच या लग्नाबद्दल केदार शिंदे आणि बेला शिंदे यांची लेक सना हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले की, आई-बाबांचा कधी साखरपुडा झाला नव्हता. हळदीचा कार्यक्रम पार पडला नव्हता, एकत्र राहण्यासाठीची वचन घेण्यासाठी त्यांनी मुहूर्त पाहिला नव्हता.

त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या २५व्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना ही स्पेशल भेट द्यायचे ठरविले. लग्नसोहळा नाही तर लग्न महत्त्वाचे असते हे पटवून देण्यासाठी आई-बाबा तुमचे आभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here