Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आज उद्धव ठाकरे माेदींना भेटणार

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आज उद्धव ठाकरे माेदींना भेटणार

मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारने भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव (Uddhav Thackeray)  ठाकरे यांची दिल्लीत पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे.

त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, (Ajit Pawar) मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

वृद्ध पत्नीला मारहाण प्रकरण, गजानन बुवाला (Gajanan Buwa)ठोकल्या बेड्या

कोविडशी संबंधित काही विषय बैठकीत चर्चेत येणार आहेत. नुकताच महाराष्ट्रात वादळाने तडाखा दिला. त्यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती पंतप्रधानांना देण्यात येणार आहे.

PM Modi Live Speech : 18 वर्षांवरील सर्व लोकांना मोफत लस, मोदी ने केले जाहीर

गुजरात आणि आसामला केंद्राने मदत केली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वादळाने झालेले नुकसान आणि त्यासाठी केंद्राकडून हवी असणारी मदत, जीएसटीपोटी थकलेली रक्कम हे विषयदेखील पंतप्रधानांशी चर्चिले जातील, अशी माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here