Maratha Reservation : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने  केले रद्द, महाराष्ट्र सरकारला मोठा झटका

Maratha Reservation : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने  केले रद्द, महाराष्ट्र सरकारला मोठा झटका
Maratha Reservation : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने  केले रद्द, महाराष्ट्र सरकारला मोठा झटका

Maratha Reservation : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने  केले रद्द, महाराष्ट्र सरकारला मोठा झटका

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली. मराठा आरक्षण (Maratha Reservation Case) रद्द करण्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्याने महाराष्ट्र सरकारला मोठा झटका मानला जात आहे.राज्य सरकारने दिलेलं मराठा आरक्षण (Maratha reservation) सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे.

सर्वोच्च न्यायालयात बुधवारी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली . न्या. अशोक भूषण, न्या. एल. नागेश्वरराव, न्या. एस. नाझीर, न्या. हेमंत गुप्ता आणि न्या.एस. रवींद्र भट यांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला.

Shocking News : महिलेने एकावेळी दिला 9 मुलांना जन्म,जाणून घ्या अनोखी घटना

जून- २०१९ मध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग आरक्षण कायद्यान्वये (एसईबीसी) मराठा समाजाला विविध शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये सोळा टक्के आरक्षण देण्यात आले होते , या कायद्याच्या वैधतेवर शिक्कामोर्तब केले होते.

तसेच शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठीचा कोटा बारा टक्के तर सरकारी नोकऱ्यांमधील कोटा १३ टक्क्यांपर्यंत घटविला होता.

Kangana Ranaut Twitter Suspended: ट्विटर ने घेतली ऍक्शन अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड

राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग आरक्षण कायद्याच्या (एसईबीसी) (SEBC) वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायपीठाने निर्य़ण घेतला. या कायद्यान्वयेच मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात आले होते. तत्पूर्वी न्यायालयाने 26 मार्च 2021 रोजी झालेल्या सुनावणीवेळी याबाबतचा निकाल राखून ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here