Mansoon Health Tips In Marathi : पावसाळ्यात अशी घ्या काळजी,आजारांना ठेवा दूर

Mansoon Health Tips In Marathi : पावसाळ्यात अशी घ्या काळजी,आजारांना ठेवा दूर

उन्हाळ्यापासून (Mansoon) सुटका मिळावी यासाठी पावसाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. कारण पावसाच्या सरी या सर्वांनाच हव्या हव्याश्या वाटत असतात.

सर्वांनाच हवेतील गारवा अनुभवायचा असतो. पण, या गारव्यासोबत इतरही रोग, जंतू वाढत असतात. त्यामुळे काळजी तितकीच काळजी घेणेही महत्त्वाचे असते. सध्या कोरोनाची (Corona) देखील महामारी आहे. यात इतर आजारांशी देखील सामना करणे फार गरजेचे आहे.त्यासाठी खाली दिलेल्या टिप्स चा उपयोग नक्की घ्या.

Weather Updates : येत्या 4 तासांत मुंबई,ठाणे,सिंधुदुर्गात आणि रायगडात अतिवृष्टीची शक्यता

1. पचनास जड पदार्थ खाऊ नयेत

पावसाळ्यात अति तेलकट, खारट आणि आंबट पदार्थ खाऊ नयेत. कारण यामुळे अपचन, पित्त वाढणे आणि पोट फुगणे यांसारखे आजार होऊ शकतात. यासाठी पावसाळ्यात पचनास हलके पदार्थ खावेत.

शिजवलेले सलाड, ताजी फळे, मुगाची डाळ, खिचडी, मका, बेसन आणि ओट खाल्यास तुम्हांला पचनाचा त्रास होणार नाही.

2.  पालेभाज्या स्वच्छ धुवून खाव्यात

पावसाळ्यात पालेभाज्या खायच्या असतील तर मीठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून मगच खाव्यात.पालेभाज्या जमिनीलगत असल्यामुळे त्यांना खूप माती आणि चिखल लागलेला असतो. त्यामुळे जंतूसंसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.

3.  जेवणासाठी योग्य तेल निवडावे

मोहरीचे तेल, शेंगदाण्याचे तेल आणि बटर वापरण्याऐवजी तूप, ऑलिव्ह ऑइल आणि सूर्यफूलाचे तेल वापरावे. पचनास जड असणारे तेल खाल्याने शरीरातील उष्णता वाढते.

Dilip Kumar यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पत्नी ने मानले चाहत्यांचे आभार

4. व्यायाम कमी करावा

पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. त्यामुळे या दिवसांत शरीराला जास्त ताण देणारे व्यायाम केल्यास शरीरातील पित्त वाढते. पावसाळ्यात पोहणे, योगासने किंवा चालणे यांसारखे सोपे व्यायम करावेत. (पावसाळ्यात हे 7 घरगुतीउपाय वाढवतील तुमची रोगप्रतिकारक शक्ती )

5. बाहेरचे/उघड्यावरचे खाणे टाळा

पावसाळ्याच्या दिवसांत तुमच्या आवडीचे भेळ, पाणीपुरी यांसारखे बाहेरचे पदार्थ खाऊ नयेत. पावसाळ्यात हवेतील आर्द्रतोमुळे बाहेरच्या पदार्थांमधील पोषक घटक निघून जातात व जंतूसंसर्गाचा धोका निर्माण होतो.

6. गरम पाणी प्यावे

पावसाळ्याच्या दिवसात आजारी पडण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे आहारात गरम पाणी पिण्याचा समावेश करावा.

7. पावसात भिजल्यास लगेच करा अंघोळ

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दरात दुसऱ्या दिवशीही वाढ

पावसात तुम्ही भिजला असाल तर इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी घरी आल्यानंतर लगेचच छान आंघोळ करा. तसेच ओल्या अंगाने एसीजवळ जाऊ नका नाहीतर व्हायरल ताप आणि सर्दी, खोकला होऊ शकतो.

8.  मसाज करावा

आठवड्यातून किमान दोनदा तिळाच्या तेलाने मसाज केल्यास पित्तामुळे वाढलेली उष्णता कमी होऊन शरीर निरोगी राहण्यास मदत होते. तिळाचे तेल जास्त उष्ण वाटत असेत तर खोबरेल तेलाने मसाज केला तरी चालेल.

9. घर स्वच्छ आणि किटाणूरहित ठेवा

घरामध्ये झुरळं, किटक, डास झाले असल्यास पावसापूर्वीच पेस्ट कंट्रोल करून घ्या.

Weather Updates : येत्या 4 तासांत मुंबई,ठाणे,सिंधुदुर्गात आणि रायगडात अतिवृष्टीची शक्यता

10. असे करा घरगुती उपाय

गरम दूधामध्ये हळद, सुंठ पावडर आणि मध घालून प्याल्यास सर्दी, खोकला आणि अंगदुखीपासून आराम मिळतो. चहा बनवताना त्यात तुळशीची पानं, आलं आणि काळीमिरी घाला. सर्दी-खोकल्यावर हा उत्तम उपाय आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here