Mamata Banerjee: ममता बॅनर्जीं मुख्यमंत्रीपदी विराजमान, शपथविधी संपन्न

Mamata Banerjee: ममता बॅनर्जीं मुख्यमंत्रीपदी विराजमान, शपथविधी संपन्न
Mamata Banerjee: ममता बॅनर्जीं मुख्यमंत्रीपदी विराजमान, शपथविधी संपन्न

Mamata Banerjee: ममता बॅनर्जीं मुख्यमंत्रीपदी विराजमान, शपथविधी संपन्न

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आज सकाळी 10 वाजून 45 मिनीटांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे. विधानसभा निवडणुकीत तृणमूल कांग्रेसने दणदणीत विजय मिळवला.

Maratha Reservation : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने  केले रद्द, महाराष्ट्र सरकारला मोठा झटका

राज्यात असलेले कोरोनाचे संकट लक्षात घेता आजचा शपथविधीचा कार्यक्रम हा छोट्या प्रमाणात घेण्यात आला आहे.हा त्यांच्या सोबत त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी आणि प्रशांत किशोर उपस्थित होते.

आज पार पडणाऱ्या या कार्यक्रमासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, तृणमूलचे महासचिव पार्थ चटर्जी, ज्येष्ठ नेते सुब्रतो मुखर्जी, राज्याचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांना आमंत्रित करण्यात आले होते. या व्यतिरिक्त डाव्या पक्षाचे नेते विमान बोस, बंगाल भाजपाचे अध्यक्ष दिलीप घोष, भाजप नेते मनोज टिग्गा, काँग्रेस नेते अब्दुल मन्नान, प्रदिप भट्टाचार्य, काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांना आमंत्रित करण्यात आले होते.

Shocking News : महिलेने एकावेळी दिला 9 मुलांना जन्म,जाणून घ्या अनोखी घटना

ममता यांनी बंगाली भाषेत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बाकीचे सर्व मंत्री ९ मे रोजी रविंद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिवशी शपथ घेतील.ममता यांनी या शपथविधी सोहळ्यासाठी पांढरी साडी आणि शाल परिधान केली होती.

आजच्या परिस्थिती मध्ये ममता बॅनर्जी या भारतातल्या एकमेव महिला मुख्यमंत्री आहेत. आपले प्राधान्य करोनाविरुद्धचा लढा हेच असेल असेही त्या शपथ घेतल्यावर म्हणाल्या. त्यांनी लोकांना शांतता राखण्याचेही आवाहन केले.या शपथविधीनंतर राज्यपाल धनकर यांनी ममता यांचे अभिनंदन केले आणि सध्या चाललेला हिंसाचार थांबवून पुन्हा एकदा शांतता व सुव्यवस्था स्थापन करण्यास सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here