Maharashtra Updates :  आजपासून शाळा भरणार ‘टीव्ही’द्वारे

Maharashtra Updates :  आजपासून शाळा भरणार ‘टीव्ही’द्वारे

मुलांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोचत नसेल म्हणून मुलांची ‘टिव्ही’ (Tv) द्वारे शाळा सोमवारपासून म्हणजेच आजपासून भरणार आहे. आठवड्यातील पाच दिवस ही शाळा असणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने अधिकृतरित्या राज्यातील सर्व शाळा मंगळवारपासून  सुरू होणार असल्याचे जाहीर केले असले, तरीही ‘टिव्ही’द्वारे शाळा त्याआधी एक दिवस सुरू होणार आहे.

VVCMC Recruitment 2021 : वसई विरार महानगरपालिकामध्ये चालक पदांच्या १०० जागा

शिक्षण विभागाने सुधारित परिपत्रक काढून राज्यातील सर्व शाळा १५ जूनपासून ऑनलाइनद्वारे सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

आपत्कालीन परिस्थितीमुळे राज्यात विविध निर्बंध लागू आहेत. परिणामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘डी. डी. सह्याद्री वाहिनी’ (D.D.Sahyadri Vahini ) वरून १४ जूनपासून सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दररोज पाच तास (३०० मिनिटे) इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण होणार आहे.

KVK  Recruitment 2021 : कृषि विज्ञान केंद्रात विविध पदांची भरती, बारावी ते पदवी पास उमेदवारांना संधी

‘डी.डी. सह्याद्री वाहिनी’वर होणार शाळा

1 . १४ जूनपासून भरणार शाळा

2.  वेळ : सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० पर्यंत

3. प्रक्षेपणाचे दिवस : दर सोमवार ते शुक्रवार

4. पहिला टप्पा : इयत्ता दहावीसाठी मराठी व इंग्रजी माध्यम, तर इयत्ता बारावीच्या तिन्ही शाखांच्या शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण सुरू होईल

5.  दुसरा टप्पा : उर्वरित इयत्तांच्या तासिकांचे प्रक्षेपण लवकरच होणार सुरू

MHT CET 2021 : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षेेेची अर्ज प्रक्रिया चालू

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील शैक्षणिक कार्यक्रमाच्या प्रसारणाचे सविस्तर वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या ‘www.maa.ac.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती परिषदेचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here