Maharashtra SSC Result 2021 : दहावीचा निकाल जूनमध्ये, 11 वी प्रवेशाची प्रक्रियाही ठरली

Maharashtra SSC Result 2021 : दहावीचा निकाल जूनमध्ये, 11 वी प्रवेशाची प्रक्रियाही ठरली

दहावीच्या (SSC) निकालाचे निकष जाहीर करताना वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दहावीचा निकाल जूनअखेर लावू असं म्हटलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत समाधान नसेल त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत दोन संधी उपलब्ध राहतील, असं म्हटलं आहे.

YELLOW FUNGUS: ब्लैक आणि व्हाइटनंतर आता यलो फंगस मुळे वाढली चिंता

वाढत असलेल्या कोरोनाच्या (Corona)  संसर्गामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या सुरक्षेच्या कारणामुळे आम्ही दहावीच्या विद्यार्थ्यांना सरकसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. अकरावी प्रवेशासाठी पुढील काळात ऑनलाईन सीईटी(CET Exam) आयोजित केली जाणर असल्याची माहिती त्यांनी दिली.

दहावी परीक्षेच्या निकालाचे निकष 

वर्षातील लेखी मूल्यमापन – 30 गुण
दहावीचे गृहपाठ, तोंडी किंवा प्रात्यक्षिक अंतर्गत – 20 गुण
नववीचा विषयानिहाय गुण – 50 गुण

JEE Advance 2021: कोविडमुळे आयआयटी प्रवेश परीक्षा पुढे ढकलली, परीक्षा कधी होणार, संपूर्ण तपशील पहा

या निकषानुसार  मिळालेले गुण ज्या विद्यार्थ्यांना मान्य नसतील त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत कोरोना परिस्थिती सामान्य झाल्यानंतर दोन संधी उपलब्ध करुन देण्यात येतील, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन सीईटी परीक्षा घेण्यात येणार असल्याचं देखील वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले.विद्यार्थ्यांची ही माहिती सरल पोर्टलवर उपलब्ध आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here