Maharashtra Lockdown : महाराष्ट्रात 31 मेपर्यंत लॉकडाऊन, निर्बंध कायम!

Maharashtra coronavirus lockdown

Maharashtra Lockdown : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आता 31मेपर्यंत वाढवण्यात आला आहे.राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे 15 मेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. अशातच राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून आला. राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. राज्यात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन लागू असणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक राज्य सरकारनं जारी केलं आहे.

अशी आहे नवीन नियमावली

-किराणा दुकाने- सकाळी 7 ते 11

-दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री- सकाळी 7 ते 11

-भाजीपाला विक्री- सकाळी 7 ते 11

-फळे विक्री- सकाळी 7 ते 11

-अंडी.मटण, चिकन.मासे विक्री- सकाळी 7 ते 11

– कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने- सकाळी 7 ते 11

-पशूखाद्य विक्री- सकाळी 7 ते 11

-बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ

दुकाने -सकाळी 7 ते 11

-पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने- सकाळी 7 ते 11

-येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची

-दुकाने-सकाळी 7 ते 11

लॉकडाऊन लागू केल्याने मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्याशहरांत कोरोना रुग्ण वाढीला ब्रेक लागला आणि रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील इतर भागांतील कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी हे कठोर निर्बंध आणखी काही दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Corona Vaccination : भारतात आतापर्यंत 17.70 कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण; तर गेल्या 24 तासांत 17.70 लाख लोकांना लस Corona

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने 5 एप्रिल 2021 रोजी ब्रेक द चेन अंतर्गत कठोर नियम लागू केले. त्यानंतर सुद्धा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून 1 मेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. यानंतर पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने हे निर्बंध 15 मे 2021 पर्यंत लागू ठेवण्याचा निर्णय घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here