Maharashtra Lockdown: राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाउन कायम; पण ‘या’ ठिकाणी होणार निर्बंध कमी

Maharashtra Lockdown extended:राज्यात   लॉकडाउन कमी करण्याचे किवा ‘ब्रेक दि चेन’चे (break the chain) आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर (positivity rate) आणि तेथील ऑक्सिजन खाटांची (oxygen beds) उपलब्धता याचा विचार करण्यात येईल.

त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निबंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. यासाठी २९ मे २०२१ रोजी आठवड्याच्या शेवटी असलेला पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता याचा विचार केला जाणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. (Maharashtra Lockdown extended until June 15 But the restrictions on this place will be relaxed)

 

पॉझिटीव्हीटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी असलेलेजिल्हे आणि पालिकांसाठी वेगळी नियमावली

ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल तसेच एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स ४० टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तिथे १२ मे २०२१ “ब्रेक दि चेन’ आदेशाप्रमाणे निर्बंध शिथिल होतील.

-सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील.

Maharashtra SSC Result 2021 : दहावीचा निकाल जूनमध्ये, 11 वी प्रवेशाची प्रक्रियाही ठरली

-आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा (केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र, आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील. अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई-कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील.

– दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर

प्रशासकीय घटकांमध्ये न येणारी इतर सर्व जिल्हे व पालिकांच्या ठिकाणी १२ मे २०२१ चे “ब्रेक दि चेन’चे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील.

दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल. तसेच १२ मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here