Maharashtra Education:उन्हाळी सुट्ट्या जाहीर, शाळा व पुढील शैक्षणिक वर्ष 14 जून पासून सुरू

Maharashtra Education Department declared summer vacation for primary and secondary schools till 13 June

महाराष्ट्रतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना शनिवार 1 मे 2021 पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. या सुट्या.13 जून 2021 पर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे, ( Maharashtra Education)अशी माहिती शालेय शिक्षण विभागाच्यावतीनं देण्यात आली आहे

पुढील शैक्षणिक वर्ष 2021-22 सोमवार 14 जून 2021 रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तर,जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवार 28 जून 2021 रोजी शाळा सुरू होतील. या बाबत शिक्षण संचालकांकडून नुकतेच सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना एका पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

हे नक्की वाचा: PM Kisan Samman Nidhi Scheme 2021 : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 4 हजार, अशी करा नोंदणी

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळयाची व दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार सुट्यांबाबत या सूचना जिल्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकिय अशासकिय प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व सैनिक शाळा यांना देण्यात आल्या आहेत.

सध्या महाराष्ट्रत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून राज्यातील सर्व महानगरपालीका, सर्व नगरपालिका व सर्व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय हे सध्या बंद आहेत. 2021-22 या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याबाबत कोवीड 19 च्या प्रादुर्भावाची तत्कालीन परिस्थती विचारात घेवून शासन स्तरावरून वेळोवेळी जे आदेश येतील असे या पत्रात नमुद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here