Maharashtra Corona Virus Updates : रविवारी राज्यात 60,226 रुग्ण बरे होऊन घरी तर 48,401 नवीन रुग्ण

Maharashtra Corona Updates : रविवारी राज्यात 60,226 रुग्ण बरे होऊन घरी तर 48,401 नवीन रुग्ण

Maharashtra Corona Virus Updates : राज्यात कोरोना रुग्णवाढीची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात 48,401 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यभरात आज 60,226 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आज 572 कोरोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

रविवारीएकूण ६,१५,७८३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 44,07,818 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 86.4 % एवढे झाले आहे. काल कारण आज 82,266 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला होता तर 53,605 नवीन रुग्णांचे निदान झाले होते.

JOBS In Maharashtra:आरोग्य विभागात 16 हजार पदांची भरती, 100 टक्के पदभरतीला मान्यता

राज्यात आज 572 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% एवढा आहे. सध्या राज्यात ३६,९६,८९६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine)आहेत तर २६,९३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,१५,७८३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here