Madhuri Dixit | Happy Birthday Madhuri Dixit : धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा 53वा वाढदिवस

Madhuri Dixit | Happy Birthday Madhuri Dixit : धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा 53वा वाढदिवस

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही बॉलिवूडमधील एक अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहतावर्ग सिनेमागृहांमध्ये गर्दी करत असे. अशा या नामांकित अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. 54 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

माधुरीला बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ (dhak dhak girl madhuri dixit) म्हणून ओळखतात. खरं तर धक धक या गाण्यामुळे तिला ही ओळख मिळाली. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल हे गाण तिच्यासाठी लिहिलेलच नव्हते. दुसऱ्या एका अभिनेत्रीने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला परिणामी त्याठिकाणी माधुरीची वर्णी लागली. आणि या गाण्याने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसवले.

Battlegrounds Mobile India Pre-registration : बॅटलग्राउंड मोबाइल प्री-रजिस्ट्रेशनच्या तारखेची घोषणा कस कराल रजिस्ट्रेशन

1991 साली बेटा या चित्रपटाची निर्मिती केली जात होती. ‘बेटा’ चित्रपट सुपरहिट झाला आणि यासोबतच माधुरीचं ‘धक धक’ गाणंही सुपरहिट ठरल.

माधुरीचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. याव्यतिरिक्त 1984 पासून 1988 पर्यंत तिचे एकूण 8 चित्रपट लागोपाठ फ्लॉप होत गेले.माधुरी दीक्षित आपल्या काळातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटासाठी तिने सलमान खानपेक्षा जास्त मानधन घेतल होत.

Wheather Updates : येत्या 24 तासात अरबी समुद्रात चक्रीवादळ , जाणून घेऊया महाराष्ट्रावरील परिणाम

माधुरी दीक्षित उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम डान्सरही आहे. माधरी एक ट्रेंड कथ्थक डान्सर आहे. तसेच आपल्या काळातील ती एकमेव अशी अभिनेत्री आहे, जिला पंडित बिरजू महाराज यांनी ट्रेन केले होते. बिरजू महाराजांनी तिला इंटस्ट्रीमधील बेस्ट डान्सर म्हणूनही संबोधले आहे.

माधुरी दीक्षित ही एकमेव अशी अभिनेत्री आहे जिला तब्बल 14 वेळा फिल्मफेयर अवॉर्डसाठी नामांकन मिळाले होते .माधुरीला भारत सरकारचा प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here