LPG Booking New Rule: नियमांमध्ये मोठा बदल ,आता कोणत्याही एजन्सीकडून सिलिंडर घेणं होणार सहज शक्य

LPG Booking New Rule: नियमांमध्ये मोठा बदल ,आता कोणत्याही एजन्सीकडून सिलिंडर घेणं होणार सहज शक्य

सातत्याने होणाऱ्या इंधनदरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे नियोजन आणि गणित दोन्ही बिघडल्याचे दिसत आहे.आतापर्यंत ग्राहक संबंधित गॅस एजन्सीवर LPG सिलिंडर घेण्यास आणि ते पुन्हा भरून देण्यासाठी अवलंबून होते, परंतु लवकरच सरकार या नियमात मोठे बदल करू शकते. त्याअंतर्गत ग्राहक येत्या काही दिवसांत कोणत्याही एजन्सीकडून एलपीजी सिलिंडर घेऊ शकणार आहे किंवा त्या एजन्सीकडून ते सिलिंडर पुन्हा भरू शकतात. त्यासाठी सरकार आणि तेल कंपन्या एकत्रित प्लॅटफॉर्म तयार करण्याचे काम करीत आहेत.

स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन

सरकारला स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन द्यायचे आहे, यासाठी देशातील 100 टक्के घरात एलपीजी सिलिंडर वितरीत करण्याचं उद्दिष्ट आहे. म्हणूनच सरकार देशातील तीन मोठ्या तेल कंपन्या इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HCL) यांच्याशी चर्चा करीत आहे. या तिन्ही कंपन्या लवकरच एकत्र एक विशेष व्यासपीठ तयार करतील.

ग्राहकांना लाभ

यावेळी गॅस ग्राहक ज्या कंपनीकडून गॅस एजन्सीने कनेक्शन घेतले आहे, केवळ त्याच कंपनीचे सिलिंडर घेऊ शकत होते परंतु नवीन नियमानुसार, ग्राहक घरी बसलेल्या कोणत्याही कंपनीचे सिलिंडर मिळवू शकतात तसेच ते पुन्हा भरू शकतात. लोक जवळच्या गॅस एजन्सीकडून त्यांचे बुकिंग करून घेऊ शकतात.

रिफिलची प्रक्रियेसाठी नियम बदलण्याचा विचार

एलपीजी गॅस बुकिंग आणि रिफिलची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकार नियम बदलण्याचा विचार करीत आहे. याद्वारे ग्राहकांना बुकिंगनंतर रिफीलसाठी तासांची प्रतीक्षा करावी लागणार नाही. या व्यतिरिक्त सर्व काही सहजशक्य होणार आहे.

कोणत्याही पीओएसमधून पुन्हा भरता येणार

इतर शहर किंवा परिसरात राहणाऱ्यांना गॅस सिलिंडर मिळण्यास स्थलांतर करणार्‍यांना अडचणी येत नाही, अशा परिस्थितीत 5 किलो शॉर्ट-सिलिंडरचा पर्याय सादर केला गेलाय. हे गॅस कनेक्शन पत्त्याच्या पुराव्यांशिवाय घेतले जाऊ शकते. ग्राहकाला फक्त त्यांचा आयडी प्रूफ दाखवणे आवश्यक आहे. ते देशातील कोणत्याही ठिकाणी विक्री किंवा वितरणाच्या ठिकाणी सिलिंडर पुन्हा भरू शकतात.

ग्राहकांसाठी नवीन सुविधा

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने ग्राहकांसाठी नवीन सुविधा आणली केली आहे. आता केवळ एका कॉलवर ५ किलो LPG सिलिंडर सहज घरी मिळू शकेल. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे दाखवावी लागणार नाहीत.

इंडियन ऑइल कंपनीने 1800-22-4344 हा टोल फ्री क्रमांक ५ किलोचे LPG सिलिंडर ऑर्डर करण्यासाठी जाहीर केला आहे. या क्रमांकावर संपर्क करून ५ किलो LPG सिलिंडर मागवता येऊ शकतो.मात्र, यासाठी नाममात्र वितरण शुल्क २५ रुपये द्यावे लागेल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ओळखीचा पुरावा देणे आवश्यक असेल, असे सांगितले जात आहे.

LPG सिलिंडर बुकिंग केल्यानंतर अवघ्या २ तासांत घरी येईल. विशेष म्हणजे यासाठी कुठल्याही प्रकारचा ऍड्रेस प्रूफ देण्याची आवश्यता लागणार नाही. दिल्लीत या सिलिंडरची किंमत अनुदानाशिवाय ३४० रुपये आहे.LPG गॅस सिलिंडर ग्राहक पुन्हा रिफिल करू शकतात. आपण इंडियन गॅसच्या कोणत्याही विक्री केंद्रावर जाऊ शकता. रिटर्न खरेदीच्या तारखेपासून ५ वर्षांच्या आत असेल तर गॅस आणि कराचा खर्च वगळता सिलिंडरची खरेदी किंमत आणि प्रेशर रेग्युलेटरचे ५० टक्के पैसे परत केले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here