LLM EXAM 2021 : परीक्षा अखेर पुढे ढकलली , परंतु विद्यार्थ्यांची नाराजी कायम

LLM EXAM 2021 : परीक्षा अखेर पुढे ढकलली , परंतु विद्यार्थ्यांची नाराजी कायम
LLM EXAM 2021 : परीक्षा अखेर पुढे ढकलली , परंतु विद्यार्थ्यांची नाराजी कायम

LLM EXAM 2021 : परीक्षा अखेर पुढे ढकलली , परंतु विद्यार्थ्यांची नाराजी कायम

मुंबई विद्यापीठाच्या एलएलएमच्या (LLM) पाचव्या फेरीची प्रवेश प्रक्रिया १० एप्रिल रोजी सुरू झाली. त्यानंतर सव्वा महिन्यातच, म्हणजे १७ मे रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

POST OFFICE Schemes : पोस्ट ऑफिसच्या योजना देणार मोठा फायदा, जाणून घ्या अधिक माहिती

यामुळे या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक महिनाही पुरेसा मिळालेला नाही. म्हणून परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. यानुसार विद्यापीठाने आता एलएलएमची परीक्षा (LLM EXAM ) १ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जही भरून घेण्यात आलेले नाहीत. पाचव्या फेरीची प्रवेश प्रक्रिया १० एप्रिल पासून सुरू करण्यात आली आहे. मात्र ही प्रक्रिया कधी संपेल यानंतर सहावी यादी जाहीर होणार की नाही याबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. यामुळे प्रवेश न मिळालेले आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी संभ्रमात आहेत.

BNP Recruitment 2021: बँक नोट प्रेसमध्ये 135 जागांसाठी भरती, 12 मेपासून करा अर्ज

10 एप्रिल रोजी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना एका महिन्यानंतर ताबडतोब परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. सध्याच्या वेळापत्रकात सलग पेपर आहेत. विद्यार्थी आता परीक्षेला सामारे जातीलही. मात्र वेळापत्रक सुधारित करून, प्रत्येक पेपरच्या दरम्यान एक तरी सुट्टी द्यावी, अशी मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलचे (Student Low Council )अध्यक्ष सचिन पवार (Sachin Pawar ) यांनी केली होती.

याची दखल घेऊन विद्यापीठाने आता ही परीक्षा १ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र प्रत्येक पेपरदरम्यान सुट्टीची मागणी मान्य झालेली नाही. याबाबत विद्यार्थी नाराजी व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here