लालबाग(Lalbaug Mumbai) परिसरातील इमारतीला भीषण आग; अनेक जण अडकल्याची भीती

fire broke out at the multi storey avighna-park apartment on curry road around 12 noon today no injuries reported

Lalbaug Mumbai: मुंबईतील लालबाग परिसरातील वन अविघ्न पार्क सोसायटीतील एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग अटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.आगीची घटना घडताच १९ व्या मजल्यावरुन एका व्यक्तीने उडी घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

हा व्यक्ती जखमी झाला असून त्याला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

अविघ्न सोसायटी ही ६० मजल्याची इमारत असून या इमारतीच्या १९ व्या मजल्यावर आग लागली असून हळूहळू आग पसरत असून २५ व्या मजल्यापर्यंत आगीचे लोट पसरले आहेत. तसंच, पार्किंगपर्यंतही आग पसरली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इमारतीती अनेक लोक अडकून पडले आहेत. यातील काही कामगारांना आता इमारतीतून बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र, अजूनही काही कामगार इमारतीच्या आत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

माजी गृहमंत्री काय हनीमुनला गेले का? अमृता फडणवीसांचा सरकारला सवाल

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तसंच, लोकांना बाहेर काढण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहेत., ही इमारत करी रोड स्थानकाच्या जवळ असून निवासी इमारत आहे. मात्र, अद्याप या इमारतीत दुरुस्तीचे काम सुरू असताना ही आग लागली आहे. त्यामुळं या इमारतीत रहिवाशी जास्त नव्हते. तर, काही कामगार घटनास्थळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here