IPL 2021 Suspended : IPL 2021 रद्द, BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्लांची माहिती

IPL 2021 Suspended

IPL 2021 Suspended : काही दिवसांपासून आयपीएलमधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते कोरोनाची लागण झाल्यामुळे सोमवारी रॉयल चॅलेंजर बंगळुरू विरुद्ध कोलकाताचा सामना रद्द करण्यात आला होता.

हे नक्की वाचा: Bill Gates Divorce : २७ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर बिल गेट्स आणि मेलिंडा घेणार घटस्फोट

आयपीएलच्या या हंगामातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यंदाचा आयपीएलचा हंगाम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी अशी शक्यता वर्तवली जात होती की सर्व सामने मुंबईत हलवण्यात येणार आहेत. मात्र आता राजीव शुक्ला यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार यंदाचा सीझनच रद्द करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अत्यंत महत्त्वाचा निर्णय क्रिकेट विश्वातून घेतला जात आहे. महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असून आयपीएलला सुद्धा याचा फटका बसला आहे. एकापाठोपाठ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्यामुळे आयपीएल सीझन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याबद्दल राजीव शुक्ला यांनी घोषणा केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here