IPL 2021 Phase 2 : या सहा खेळाडूंवर बीसीसीआय व आयपीएल फ्रँचायझींची नजर, जाणून घ्या महत्त्वाचे कारण

IPL 2021 Phase 2 : या सहा खेळाडूंवर बीसीसीआय व आयपीएल फ्रँचायझींची नजर, जाणून घ्या महत्त्वाचे कारण

IPL 2021 Phase 2 : आयपीएल २०२१चा (IPL 2021) दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून यूएईत खेळवण्यात येणार आहे. पाचव्या कसोटीपूर्वी टीम इंडियाचे फिजिओ योगेर परमार यांचा कोरोना (Corona)  रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि मँचेस्टर कसोटीच रद्द करावी लागली.

या वृत्तानंतर बीसीसीआय(BCCI)  आणि आयपीएल(IPL)  फ्रँचायझी हे रोहित (Rohit Sharma), शमी, सिराज, इशांत, पुजारा आणि जडेजा यांच्यावर लक्ष ठेऊन आहेत. हे सर्व खेळाडू फिजिओ योगेश परमार यांच्या संपर्कात आले होते, असे वृत्त InsideSport ने दिले आहे. त्यामुळे हे खेळाडू आयपीएलच्या काही सामन्यांना मुकणार की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

”बीसीसीआय याबाबत काय नियमावली बनवते, याची प्रतीक्षा आम्ही करत आहोत. आम्ही आशा करतो की सर्व खेळाडू सुरक्षित असतील आणि ते यूएईतही सुरक्षित दाखल होतील. एक जरी पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर त्याचा परिणाम संपूर्ण स्पर्धेवर होईल. सर्व खेळाडूंनी दोन्ही डोस घेतले आहेत आणि त्यामुळे चिंता करण्याचे कारण नसावे,”असे एका फ्रँचायझीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Ganesh Chaturthi 2021 : जाणून घ्या गणपती स्थापनेचा मुहूर्त ,गणपती स्थापणेनिमित्तअशा द्या शुभेच्छा

”परिस्थिती धोक्याचा इशारा देत आहे. एक जरी पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर संपूर्ण आयपीएल अडचणीत येईल. सर्व खेळाडू एकत्र होते आणि एकाच चार्टर्ड फ्लाईटने यूएईत दाखल होणे अपेक्षित होते,”असेही एका फ्रँचायझीने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here