IPL 2021 : उच्च न्यायालयात याचिका , दिल्लीतील सामने थांबवावेत

IPL 2021 : उच्च न्यायालयात याचिका , दिल्लीतील सामने थांबवावेत
IPL 2021 : उच्च न्यायालयात याचिका , दिल्लीतील सामने थांबवावेत

IPL 2021 : उच्च न्यायालयात याचिका , दिल्लीतील सामने थांबवावेत

भारतात दिवसेंदिवस दिवस कोरोनाचा ( Corona ) प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे .देशात कोरोनाने थैमान घातले असतानाही अशा परिस्थितीतही आयपीएलचा १४वा हंगाम खेळवण्यात येत आहे. कोरोनाची दुसरी लाट चालू असताना ही स्पर्धा घेतली जावी का , या वाक्यावर अनेकांनी विविध मते दिली आहेत.

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये काम करणाऱ्या ५ मैदान कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याने या स्पर्धेच्या भविष्याबाबत मोठी शंका निर्माण झाली आहे. सोमवारी कोलकाता वि. बंगळुरू सामना होणार होता. मात्र. कोलकाताचे दोन खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे सामना स्थगित करण्यात आला आहे. दिल्लीतील आयपीएल सामने थांबवावे, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे.

Coronavirus Lockdown in India : देशात पुन्हा लॉकडाऊन करा? टास्क फोर्सची केंद्र सरकारला शिफारस

न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह ( Pratibha.S.Singh)  यांना याचिकेच्या सुनावणीसाठी सूचीबद्ध केले गेले आहे. न्यायमुर्ती म्हणाल्या, ”ही एक जनहित याचिका आहे. वकील करण एस. ठुकराल (Karan.S.Thukral ) यांनी ही याचिका दाखल केली आहे. शहरातील रुग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन, अत्यावश्यक औषधे नसताना आणि लोक आपल्या प्रियजनांचा अंत्यसंस्कार करताना दिल्लीत आयपीएल (IPL) सामने खेळणे “अनुचित” आहे का?, असे ठुकराल यांनी याचिकेत म्हटले आहे.

सध्याच्या परिस्थितीत दिल्लीतील आयपीएल सामने रद्द करून स्टेडियम लोकांना कोविड केअर सेंटर ( Covid Care Center ) म्हणून देण्यात यावे, अशी विनंती ठुकराल यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here