India Post GDS Recruitment 2021:महाराष्ट्र टपाल विभागात 2400+ पदांची महाभरती,केवळ 10वी पास, कोणतीही परीक्षा नाही.

India Post GDS Recruitment 2021

India Post GDS Recruitment 2021: देशात आर्थिक मंदीचं सावट असताना तसेच ऑटो सेक्टरसह वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेकांना नोकऱ्या गमावण्याची वेळ आलेली असताना देशातील बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील पोस्ट खात्यात (डाक सेवा) 2400 जागांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण असलेल्या बेरोजगार तरुणांना कोणत्याही परिक्षेविना ही नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.

भारतीय टपाल विभागाने महाराष्ट्रामध्ये जीडीएसच्या (GDS) एकूण 2400+ रिक्त जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे .या पदासाठी 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार 27 एप्रिल 2021 ते 26 मे 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. . उमेदवार ग्रामीण डाक सेवक भरती पोर्टल, appost.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात. जाणून घेऊया अधिक माहिती पुढीलप्रमाणे

पदाचे नाव

ग्रामीण डाक सेवक

Branch Post Master

Assistant Branch Post Master

पदांची संख्या

2400+

अर्ज भरण्याची शेवटची तारीख

26 मे 2021

पगार

1 BPM – रुपये.12,000/- ते रुपये.14,500/-

2 ABPM/Dak Sevak – रुपये.10,000/- ते रुपये.12,000/

शैक्षणिक अर्हता

1. इच्छुक आणि पात्र उमेदवार हा १०वी पास असावा

2. कम्प्युटरचं ज्ञान आवश्यक

3. अर्जदाराला स्थानिक भाषा (मराठी) चं ज्ञान आवश्यक आहे

वयोमर्यादा

अर्जदार उमेदवाराचं वय कमीत कमी १८ वर्षे आणि अधिकाधिक ४० वर्षांच्या दरम्यान असावं

एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांपर्यंत वयाची अट शिथिल

इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्षांपर्यंत वयाची अट शिथिल

परीक्षा फी

सर्वसाधारण प्रवर्ग, इतर मागासवर्गीय प्रवर्ग आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा फी १०० रुपये इतकी आहे. तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी द्यावी लागणार नाहीये.

नक्की वाचा:  खुशखबर ! राज्यात मे महिन्यात कोरोना चे प्रमाण होणार कमी ,टास्क फोर्स ने वर्तवले

अर्ज करण्याची प्रक्रिया

इच्छुक उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज सादर करावा. त्यासाठी उमेदवाराला आपला उमेदवारी अर्ज https://indiapost.gov.in किंवा http://appost.in/gdsonline या वेबसाईटवर आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. अर्जापूर्वी उमेदवाराला नाव नोंदणी करावं लागणार आहे. अर्ज नोंदणीची तारीख 27 एप्रिल 2021 पासून ते 26 मे 2021 पर्यंत असणार आहे.

उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन संपूर्ण वाचून घ्यावं. त्यानंतरच आपला उमेदवारी अर्ज दाखल करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here