आता दुसरा ‘मॅग्नाइट मॅन’ तोही नाशिकमध्ये बघण्यासाठी गर्दी

magnetic man in Nashik

सिडको मध्ये एक मॅग्नाइट मॅन (magnetic man in Nashik)सापडल्या नंतर अंबड परिसरातील एका ६१ वर्षीय कंपनीमालक व निमाच्या कमिटी मेंबरने कोव्हिशील्ड लशीचा दुसरा डोस घेऊन दोन महिने झाले असतानाही त्यांच्या अंगाला लोखंडी व स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा दावा केला असून, त्यांना बघण्यासाठी नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसून आले.

अंबडमधील महालक्ष्मीनगरमधील नानासाहेब देवरे (वय ६१) यांनी १० एप्रिलला कोव्हिशील्ड लशीचा दुसरा डोस घेतला. तब्बल दोन महिन्यांनंतर आता १० जूनला त्यांच्या शरीरावर लोखंडी वस्तू चिकटत असल्याचे दिसून आले. कंपनीत बसलेले असतानाच त्यांनी हा प्रयोग करून बघितला.

नाशिकमधील अजब प्रकार :करोना लस घेतल्यानंतर अंगाला चिकटू लागलं स्टील आणि लोखंड

कामगारांच्या जेवणाचे डबे, चमचे व कॉइन लावून बघितले तर खरोखर हाताला, छातीला, पाठीला, कपाळाला व गालालाही या सर्व वस्तू चिकटल्याने सर्व जण आश्चर्यचकित झाले. त्यामुळे कामगारांमध्ये एकच चर्चा रंगली.

त्यानंतर ते घरी आले. घरी हा प्रयोग कुटुंबासोबत केला, तर खरोखर सर्व वस्तू चिकटत होत्या. याबाबत परिसरात एकच चर्चा रंगली. परिसरातील लोकही तो प्रयोग बघण्यासाठी गर्दी करू लागले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here