Hindustani Bhau: हिंदुस्थानी भाऊला मुंबई पोलिसांनी केली अटक, नेमकं कारण काय?

Hindustani Bhau arrested by Mumbai police for violating section 144 rules

‘बिग बॉस’ ‘रिआलिटी शो’चा स्पर्धक आणि सोशल मीडियावर ‘हिंदुस्थानी भाऊ’ (Hindustani Bhau) म्हणून प्रसिद्ध असलेल्या विकास पाठक (Vikas Pathak) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पापाराजी विराल भयानीनं इन्स्टाग्रामवर ही बातमी शेअर केली आहे.

कंगणा राणौतला(Kangana Ranaut) कोरोनाची लागण,म्हणाली कल्पनाच नव्हती हे विषाणू माझ्या शरिरात पार्टी करतायेत

भाऊ मुंबईत शिवाजी पार्क येथे आंदोलन करत होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. इयत्ता 12वीच्या मुलांची परीक्षा रद्द करण्यासाठी हिंदुस्थानी भाऊ आंदोलन करत होता. याशिवाय सरकारनं मुलांची शालेय फी माफ करावी, अशी मागणी देखील करत हिंदुस्थानी भाऊ आंदोलन करत होता”, असं विशाल भयानीच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हिंदुस्थानी भाऊ सोशल मीडियात व्हिडिओमुळे खूप प्रसिद्ध आहे. रोखठोक आणि बेधडक भूमिकेसाठी हिंदुस्थानी भाऊची तरुणाईमध्ये खूप क्रेझ आहे. देशाविरोधात भाष्य करणाऱ्यांना ‘हिंदुस्तानी भाऊ’ त्याच्या शैलीत फिरकी घेतो. भाऊचे टिकटॉकवर 6 लाख फॉलोअर्स होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here