Hardik Pandya | Hardik Pandya Biography in Marathi: : शाळेची फी भरायला पैसे नव्हते, नववीमध्ये सोडली शाळा, आज करोडपती

Hardik Pandya | Hardik Pandya Biography in Marathi

Hardik Pandya | Hardik Pandya Biography in Marathi: : शाळेची फी भरायला पैसे नव्हते, नववीमध्ये सोडली शाळा, आज करोडपती

भारतीय संघाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू ज्याने कमी कालावधीत भारताच्याच नव्हे तर परदेशातल्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलय ,जाणून घेऊया त्याचे जीवनचरित्र

हार्दिक पांड्याचा ( Hardik Pandya) जन्म 11 ऑक्टोबर 193 रोजी गुजरातच्या सुरत येथे राहणाऱ्या हिमांशू पंड्या यांच्या घरी झाला. हिमांशू पांड्या म्हणजेच हार्दिकचे वडील कार फायनान्सचा छोटा व्यवसाय करत असत.त्यांना 3 वेळा हृद्याचा झटका आल्याने त्यांनी नोकरी सोडली.

हार्दिक 5 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी त्यांचा व्यवसाय सोडला आणि ते सुरतवरून बडोदामध्ये स्थायी झाले. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला आणि कृणालला किरण मोरे यांच्या क्रिकेट अकादमीत दाखल केले होते. त्यावेळी हार्दिक 5 आणि कृणाल 7 वर्षांचा होता.

IPL 2021 : उच्च न्यायालयात याचिका , दिल्लीतील सामने थांबवावेत

गुजरातमधील गावाअंतर्गत होणाऱ्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत हार्दिक आणि कृणालला एका सामन्याचे प्रत्येकी 400 आणि 500 रुपये मिळायचे.हार्दिकने भारताकडून कसोटी क्रिकेट खेळले आहे. त्याने 18 कसोटी सामन्यात 121 धावा आणि 14 विकेट्स घेतल्या आहेत.हार्दिकने 9वीमध्ये असताना नापास झाला होता. म्हणून त्याने क्रिकेटसाठी त्याचे शिक्षण सोडले.

हार्दिकला मुंबई इंडियन्समधील (Mumbai Indians ) त्याच्या संघ सहकाऱ्यांनी रॉकस्टार हे टोपणनाव दिले आहे.

आयपीएलमध्ये (IPL ) पदार्पण करताच त्याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात 8 चेंडूत 21 धावा केल्या होत्या. तर, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 31 चेंडूतील 61 धावांनी त्याला सामनावीर पुरस्कार मिळवून दिला होता.

आयसीसी टी20 (ICC T20) विश्वचषकात बांग्लादेशविरुद्ध हार्दिकने अविस्मरणीय गोलंदाजी केली होती. बांग्लादेशला शेवटच्या 3 चेंडूत 2 धावांची गरज होती. यावेळी हार्दिकने गोलंदाजी करत 3 चेंडूत 2 झेल आणि 1 धावबाद अशी हॅटट्रीक घेतली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here